Nana Patole Agrowon
ॲग्रो विशेष

Nana Patole : राज्य सरकार केवळ लाडका बिल्डर, लाडका उद्योगपतींसाठीच काम करतंय; शेतकऱ्यांसाठी कधी वेळ काढणार? पटोलेंचा सवाल

Nana Patole On State Government : राज्यातील महायुती सरकारकडून आगामी विधानसभा निवडणुकींचा विचार करून विविध घोषणा केल्या जात आहेत. मात्र राज्यातील शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे कानाडोळा केला आहे. यावरून विरोधकांकडून सरकारवर टीका होत आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यातील महायुती सरकार आगामी विधानसभा निवडणूका डोळ्यासमोर ठेवून फक्त घोषणा करत आहे. याचाच एक भाग म्हणून लाडकी बहिण आणि लाडका भाऊ सारख्या योजना आणल्या. या योजना आणल्या ही चांगली बाब आहे मात्र सरकार लाडका बिल्डर, लाडका उद्योगपती यांच्यासाठीच काम करत असल्याचे उघड होत आहे. त्यामुळे युतीचे सरकार शेतकऱ्यांसाठी कधी वेळ काढणार असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. तसेच सरकारवर टीका करताना, राज्यातील बळीराजा संकटात असून, सरकारने त्याचा विचार करावा. तेलंगणातील काँग्रेस सरकारच्या धर्तीवर राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी पटोले यांनी केली आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील सत्ताधारी विशेष अधिवेशन घेण्याच्या तयारीत दिसते. यात शेतकऱ्यांना कर्जमाफी, मराठा आरक्षण आणि विधान परिषद सभापती निवडीचा विषय घेण्याची शक्यता आहे. याआधीच शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा विषय काँग्रेसने लावून धरला असून विरोधक सरकारविरोधात आक्रमक असल्याचे पटोले म्हणाले.

तसेच सत्ताधाऱ्यांना राज्यातील बळीराजाकडे संपूर्ण दुर्लक्ष केले आहे. तसेच केंद्रातील एनडीए सरकारने देखील अर्थसंकल्पात राज्याच्या कृषी क्षेत्राला झुकते माप दिल्याचा दावा पटोले यांनी केला आहे. राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची कठीण परिस्थिती लक्षात घेऊन सरसकट कर्जमाफी द्यावी, अशी मागणी पटोले यांनी केली.

यावेळी पटोले म्हणाले, राज्यात यावर्षी वातावरणातील बदलाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. काही भागात दुष्काळ, तर काही भागात ओला दुष्काळ अशी परिस्थितीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. आता पावसाळ्यात देखील काही भागात अतिवृष्टी झाली आहे. काही भागात अजून पावसाची प्रतिक्षा आहे. काही ठिकाणी दुबार पेरणीचे संकट आहे. बोगस खते बि-बियाणांचे सुळसुळाट सुरूच आहे. पण सरकार शेतकऱ्यांना पोळक आश्वासनांशिवाय काहीच देत नाही. पीक विम्याच्या लोकप्रिय घोषणा केल्या. परंतु त्याचा फायदा शेतकऱ्यांना झालेला नाही. मात्र पीक विमा कंपन्यांना गडगंज फायदा झाला. यातूनच शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. गेल्या सहा महिन्यात १ हजार ७२७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. हे महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी बाब आहे. अशा काळात शेतकऱ्यांच्या पाठिशी सरकारने उभे राहायला हवे. मात्र सरकार तसे करायला तयार नाही.

लाडक्या घोषणांबरोबर शेतकऱ्यांकडे बघा

महायुती सरकार सध्या लाडक्या घोषणेत बिझी आहे. लाडका बिल्डर, लाडका उद्योगपती यांच्यासाठी महायुती सरकार काम करत आहे. उद्योगपती अनिल अंबानी यांचे १७०० कोटी रुपये माफ केले. यासाठी सरकारकडे कोठून पैसे आले. मोठ्या उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपयांचे कर्ज एनडीए सरकारने माफ केले. पण शेतकऱ्यांना देण्यासाठी सरकारकडे पैसे नाही. हा दुजाभाव का? असा सवाल पटोले यांनी केला.

राज्यपालांकडे कर्जमाफीची मागणी

काँग्रेसच्या शिष्टमंडळाने ११ जूनला राज्यपाल यांची भेट घेतली. या भेटीत राज्यातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीकडे लक्ष वेधण्यात आले. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात काँग्रेस पक्षाने राज्य सरकारकडे यासंदर्भात मागणी केली होती. पण महाभ्रष्टयुती सरकारने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेल, अशी अपेक्षा होती. पण केंद्र सरकारने देखील शेतकऱ्यांची निशाराच केली. महाविकास आघाडी सरकार येताच शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेणार असल्याचे नाना पटोले यांनी जाहीर केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT