Water Shortage Issue Agrowon
ॲग्रो विशेष

Water Shortage Issue : नशिराबाद-तरसोदमध्ये पाण्यावरून पेटणार संघर्ष

Water Dam Stock : धरणात पुरेसा पाणीसाठा नाही, त्यात तो नशिराबादला पुरत नसताना त्याच धरणावरून जलजीवन मिशन योजनेंतर्गत तरसोद गावासाठी पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

Team Agrowon

Water Problem : नशिराबाद : धरणात पुरेसा पाणीसाठा नाही, त्यात तो नशिराबादला पुरत नसताना त्याच धरणावरून जलजीवन मिशन योजनेंतर्गत तरसोद गावासाठी पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे कायम पाणीटंचाईचा सामना करीत असलेले नशिराबाद व तरसोदच्या नागरिकांत येणाऱ्या काळात पाण्यासाठी संघर्षाची शक्यता निर्माण झाली आहे.

गेल्या वर्षी २० मार्चला जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासक कार्यकाळामध्ये जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने तरसोद गावासाठी जलजीवन मिशन योजनेंतर्गत योजना मंजूर केली व त्यासाठी लागणारे पाणी नशिराबादच्या मुर्दापूर धरणातून घेण्याचे ठरले.

मुर्दापूरची क्षमता नाही

प्रत्यक्षात मुर्दापूर धरणाचा जलसाठा फक्त ११० दक्षलक्ष घनमीटर आहे. त्यात नशिराबाद गावाची पाणीपुरवठा योजना आजही तेथून सुरू आहे. उन्हाळ्यात या धरणात फक्त १५ ते २० टक्के पाणीसाठा असतो. गेल्या दहा वर्षांत हे धरण दोनवेळा कोरडे होते.

अशी परिस्थिती असताना जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने ही योजना नशिराबद मुर्दापूर धरणऐवजी शेळगाव बॅरेज किंवा वाघूर धरण येथून मंजूर करायला हवी होती. तशी मागणी तरसोद ग्रामपंचायतीने जिल्हा परिषदेकडे केली होती.

वास्तविक जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी नशिराबाद गावातील लोकप्रतिनिधी, नगरपरिषदच्या प्रशासकांशी धरणातील उपलब्ध पाण्यासंदर्भात चर्चा करणे अपेक्षित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT