Team Agrowon
स्वतंत्र मिळून 76 वर्ष झाली. तरीही शुद्ध पाणी सोडा, पण जसे असेल तसे पाणी मिळण्यासाठी भयंकर असे कष्ट, मेहनत करावी लागत आहेत.
त्यामुळे मूलभूत गराजांमधील पाणी मिळत नसेल तर स्वतंत्र मिळून आपण काय साध्य केले असा प्रश्न पडावा अशी स्थिती दुष्काळी/कोरडवाहू परिसरातील आहे.
माझ्या गावात पाणी टाकी आहे, पण पाणी पुरवठा होत नसल्याने घरोघरी आपापल्या सोयीनुसार पाणी मिळवावे लागत आहे. फोटो पहा. हा फोटो माझ्या घरी पाणी अशा पद्धतीने मिळवावे लागते.
गावातील इतरांना या नुसारच पाणी स्वतःच्या किंवा इतरांच्या बोअर मिळवावे लागते. तेही वीज असेल तर पाणी मिळते. नाहीतर पाण्याची टंचाई खूपच भयंकर आहे. कारण बोअरवेल 700 ते 800 फूट खोल आहेत.
विहिरी कोरड्या पडल्या आहेत. पाणी कसे मिळवणार?... ही परिस्थिती माझ्या एकट्याच्या गावाची आहे असे नाही तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी आणि कोरडवाहू परिसरातील बहुतांश गावांची आहे.
गेली तीन वर्षे सलग अतिवृष्टी झाली असली तरी ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई आहे. एकीकडे शासनाने पाणीटंचाईचे चित्र दिसू नये म्हणून टँकरची संख्या कमी केली आहे. तर दुसरीकडे सतत / प्रत्येक वर्षी पाण्याचे टँकर द्या अशी मागणी करून दमल्यामुळे आपण आपली सोयीनुसार पाणी मिळावा अशी गावकऱ्यांनी भूमिका घेतली.