Mango Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Insect Infestation : आंब्यावरील किडीच्या प्रादुर्भावामुळे चिंता

Mango Update : सध्या आंब्याच्या बहरावर मावा, तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झाल्याने चिंता वाढली आहे.

Team Agrowon

Akola News : अकोट तालुक्यातील मुंडगाव, वणी वारुळा परिसरात यंदा गावरान आंबे मोठ्या प्रमाणात फुटले आहेत. बहर लदबदलेला असून यावर्षी गावरान आंब्याची चव चाखायला मिळेल, अशी शक्यता वाढली आहे. मात्र सध्या आंब्याच्या बहरावर मावा, तुडतुड्यांचा प्रादुर्भाव झाल्याने चिंता वाढली आहे.

वणीवारुळा, मुंडगाव परीसरात आंबे बहरून आले होते. वातावरणात बदल झाल्यामुळे आंबा पिकावर मावा, तुडतुडे, चिकटवा वाढला. यामुळे गावरान आंबे कमी प्रमाणात चाखायला मिळणार आहेत.

आंब्याची झाडे उंच असल्यामुळे फवारणी करणे शक्य नाही. परिणामी झाडावर लागलेले आंबे गळून पडत आहेत. मध्यंतरी फुलोरही मोठ्या प्रमाणात गळून पडला. याबाबत योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. तेव्हा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तर नुकसान टाळता येऊ शकते. मात्र, अद्यापपर्यंत कुठलेही मार्गदर्शन देण्यात आले नाही.

माझ्या शेतातील आंबा किडीमुळे गळून पडला. शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करण्याची गरज आहे.
अनंत पालखडे, शेतकरी वणी वारुळा
या वर्षी आंब्याचे पीक मोठ्या प्रमाणात येईल अशी अपेक्षा होती. परंतु वातावरण बदलामुळे फुलोर, कीड गळाली. त्यामुळे गावरान आंबे कमी प्रमाणात चाखायला मिळणार आहेत.
अविनाश वागे, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT