Loksabha Election Agrowon
ॲग्रो विशेष

Marketing Federation Election : ‘पणन’च्या बिनविरोध निवडणुकीची तडजोड फसली

Cotton Producer Marketing Federation : कापूस उत्पादक पणन महासंघाची निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शुक्रवार (ता. २२) हा अखेरचा दिवस होता.

Team Agrowon

Yavatmal News : कापूस उत्पादक पणन महासंघाची निवडणूक बिनविरोध करण्याची रणनीती चार विभागांत फसली आहे. नागपूर, वणी, नांदेड या तीन विभागांसह ओबीसी राखीव प्रवर्गात लढत होणार असून, १३ संचालकांची बिनविरोध निवड झाली आहे.

कापूस उत्पादक पणन महासंघाची निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शुक्रवार (ता. २२) हा अखेरचा दिवस होता.

निवडणूक न होता बिनविरोध निवडीसाठी संचालकांचे प्रयत्न होते. १७ पैकी १३ ठिकाणी संचालकांचे प्रयत्न यशस्वी झाले आहे. चार ठिकाणी तडजोड न झाल्याने या विभागात निवडणूक होऊ घातली आहे. पणन महासंघाच्या ११ विभागांपैकी पाच विभाग आधीच बिनविरोध झाले होते. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर आठ विभागही बिनविरोध झाले आहे.

सूतगिरणी मतदार संघातून आमदार कुणाल पाटील, अमरावती विभागातून माजी अध्यक्ष अनंतराव देशमुख, खामगाव धृपतराव सावळे, यवतमाळ प्रफुल्ल मानकर, अनुसूचित जाती, जमाती मतदारसंघातून माजी संचालक सुरेश चिंचोळकर, विमुक्त भटक्या जाती जमाती राजकिशारे मोदी, महिला राखीव उषा शिंदे, सुनीता अळसपुरे यांची बिनविरोध निवड झाली.

नागपूर विभागात माजी आमदार सुरेश देशमुख व रमेशचंद्र बंग अशा दोन दिग्गजांचे उमेदवारी अर्ज कायम आहेत. नांदेड विभागात राजेंद्र केशवे, मोहन पाटील यांच्यात लढत होणार आहे. वणी विभागात सुभाष खाडे व चंद्रपूरचे आमदार सुभाष धोटे यांचे बंधू शेखर धोटे यांच्यात थेट लढत होणार आहे. त्यामुळे आता निवडणुकीत कोण बाजी मारणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

ओबीसी प्रवर्गात तिहेरी लढत

पणन महासंघाच्या निवडणुकीत सर्वाधिक उमेदवारी अर्ज इतर मागास प्रवर्गातून दाखल झाले होते. दहा जणांनी उमेदवारी दाखल केली होती. त्यामुळे उमेदवारी मागे घेण्यासाठी नेत्यांना चांगलीच दमछाक झाली. सात उमेदवारांनी नामांकन मागे घेतले असून, अजूनही तीन उमेदवार कायम आहेत. त्यात खामगावचे माजी संचालक प्रसेनजित पाटील, लातूरचे भरत चामले व जळगावचे चंद्रकांत बाविस्कर रिंगणात कायम आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

Papaya Mealybug Infestation: पपईवरील पिठ्या ढेकणाची वाढती समस्या

Ai in Rural Development: कृत्रिम बुद्धिमत्ता अन् ग्रामीण भारत

FPC Success Story: महिला शेतकरी कंपनीची भरारी !

Soybean Processing Success: सोयाबीन प्रक्रियेतून महिला गटाची प्रगती

SCROLL FOR NEXT