Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Survey : नुकसानग्रस्त क्षेत्राच्या पंचनाम्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करा

Unseasonal Rain : मॉन्सूनोत्तर पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे पूर्ण करा, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी यंत्रणांना दिले.

Team Agrowon

Akola News : मॉन्सूनोत्तर पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे पूर्ण करा, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी यंत्रणांना दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी अकोला तालुक्यातील दहिगाव, रामगाव, म्हैसांग या भागांत भेट देऊन पीक परिस्थितीची पाहणी केली.

शेतकऱ्यांसोबत नुकसानाबाबत चर्चा केली. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, कृषी उपसंचालक विलास वाशीमकर, तालुका कृषी अधिकारी शशिकिरण जांभरूणकर आदी या वेळी उपस्‍थित होते.

रामगाव येथे पाऊस व साचलेल्या पाण्यामुळे पिकाचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे, दहिगाव, म्हैसांग या भागांतील शिवाराचीही जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. वेचणी न झालेला कापूस ओला होणे, कापसाबरोबरच हरभरा, तूर पिकाचे या भागात नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

अकोल्याचे नुकसान पोहोचले १४ हजारांवर

गेल्या आठवडाभरापासून सतत पाऊस, ढगाळ वातावरणामुळे पीक नुकसान दरदिवसाला वाढत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात प्राथमिक अंदाजानुसार १४ हजार १४ हेक्टरचे नुकसान झालेले आहे. यात अकोला तालुक्यात ७ हजार ९५१ हेक्टर, तेल्हारा तालुक्यात ३२ हेक्टर, बार्शीटाकळी तालुक्यात ३ हजार ५४९ हेक्टरवर नुकसान झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT