Loom Industry  Agrowon
ॲग्रो विशेष

Loom Industry : हातमाग विणकरांना प्रोत्साहनासाठी स्पर्धा

Loom Workers : राज्यातील हातमाग व्यवसायातील हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्यासाठी हातमाग विणकर सहकारी संस्था, स्वयंसाह्यता गट व खासगी क्षेत्रातील हातमाग विणकरांसाठी हातमाग कापड स्पर्धा व बक्षीस योजना दरवर्षी राबविण्यात येते.

सुदर्शन सुतार

Solapur News : राज्यातील हातमाग व्यवसायातील हातमाग विणकरांना प्रोत्साहन देण्यासाठी हातमाग विणकर सहकारी संस्था, स्वयंसाह्यता गट व खासगी क्षेत्रातील हातमाग विणकरांसाठी हातमाग कापड स्पर्धा व बक्षीस योजना दरवर्षी राबविण्यात येते. यंदाही या विणकरांना प्रोत्साहनासाठी मंगळवारी (ता. १३) सोलापुरात हा उपक्रम राबवण्यात येणार आहे.

प्रादेशिक उपआयुक्त, वस्त्रोद्योग, सोलापूर यांच्या कार्यालयात सकाळी १० वाजता पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय, कन्ना चौक रविवार पेठ सोलापूर येथे हा कार्यक्रम होईल. प्रामुख्याने यातील कापड स्पर्धेकरिता हातमाग विणकरांनी हातमागावर विणलेल्या पारंपरिक व अपारंपरिक डिझाइनच्या अति उत्कृष्ट नावीन्यपूर्ण व कलात्मक वाणाची प्रदर्शित वाणांमधून निवड करण्यात येईल. त्यातील उत्कृष्ट वाणास प्रोत्साहनपर बक्षीस देऊन हातमाग विणकरांचा सन्मान करण्यात येईल.

विभागीय हातमाग कापड स्पर्धेकरिता पारंपरिक (साड्या, लुगडी, लुंगी, खाणावळी, धोतरे इत्यादी) व अपारंपरिक (टॉवेल, चादरी, शर्टिंग, कोटिंग पडद्याचे कापड, मफलर, शॉल, वॉल हॅगिंग इत्यादी) वाणांचे हातमागावर उत्पादन केलेले कलात्मक व नावीन्यपूर्ण हातमाग, विणकर सहकारी संस्था, स्वयंसाह्यता गट व खासगी विणकरांकडून प्राप्त झालेले वाण स्पर्धेत प्रदर्शित करण्यात येतील. त्यामधून विभागीय हातमाग कापड निवड समितीमार्फत उत्कृष्ट वाणाची निवड करण्यात येईल.

विणकरांचा बक्षिसाने होणार सन्मान

विभागीय हातमाग कापड स्पर्धेत सहभाग घेऊन प्रदर्शित केलेल्या वाणांमधून प्रथम पारितोषिक २५ हजार रुपये, द्वितीय २० हजार रुपये व तृतीय बक्षीस १५ हजार रुपये प्रमाणे देऊन हातमाग विणकरांचा प्रशस्तिपत्रासह सन्मान करण्यात येईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief Issue: खरीप पिकांचे मोठे नुकसान; हातकणंगलेला दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी : आमदार डॉ. अशोक माने

Farmer ID: देशात ११ कोटी शेतकऱ्यांचे 'फार्मर आयडी' तयार; मार्च २०२७ चे उद्दिष्ट ५ महिने आधीच पूर्ण- शिवराज सिंह चौहान

Tur Crop Flowering: खानदेशात पूर्वहंगामी तूर पीक आलेय फुलोऱ्यावर

Pressmud Benefits: साखर कारखान्यातील प्रेसमड शेतकऱ्यांसाठी कसा उपयुक्त? माती आणि जनावरांसाठी फायदेच फायदे

Mrig Bahar Banana Update: मृग बहर केळी ५१ हजार हेक्टरवर

SCROLL FOR NEXT