Crop Damage  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : भरपाई कधी मिळणार? शेतकऱ्यांच्या प्रतीक्षेला अंत नाही

Heavy Rain Crop Loss : खानदेशात २०२१ व २०२२ व २०२४ मध्ये खरिपात अतिवृष्टीमुळे मोठी पिकहानी झाली आहे. पण नुकसान भरपाई किंवा मदतनिधी प्राप्त झालेला नाही.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात २०२१ व २०२२ व २०२४ मध्ये खरिपात अतिवृष्टीमुळे मोठी पिकहानी झाली आहे. पण नुकसान भरपाई किंवा मदतनिधी प्राप्त झालेला नाही. काही भागात हा निधी प्राप्त झाला आहे, पण तो अतिशय तोकडा असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

२०२२ नंतर २०२३ मध्ये कमी पाऊस झाला. कमी पावसातही नुकसान झाले, पण भरपाईबाबत शासनाकडून कोणतीही घोषणा झाली नाही. २०२४ मध्ये अतिपावसाने पिके हातची गेली. कापूस, उडीद, मूग या पिकांची अतोनात हानी झाली. सर्वेक्षण करण्यात आले. पण भरपाई, मदतनिधी शेतकऱ्यांना आलेला नाही.

मध्येच निवडणुका सुरू झाल्याने प्रशासन फक्त निवडणुकीचे काम करीत होते. आता निवडणुका संपल्या आहेत. शेतकऱ्यांना मदतनिधीसंबंधी कार्यवाही करा, असा मुद्दा उपस्थित केला जात आहे.

२०२२मध्ये नुकसानग्रस्त भागाचा मोठा समावेश पंचनामे व्यवस्थित न झाल्याने करण्यात आला नाही. जळगाव जिल्ह्यात सुमारे दीड लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान अतिवृष्टीत विविध वर्षांत झाले आहे. धुळ्यात सुमारे ८० हजार व नंदुरबारातही ७० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे.

पण नुकसानीबाबतची चर्चा लोकप्रतिनिधी सध्या करीत नसल्याचे चित्र आहे. जळगाव तालुक्यात म्हसावद व परिसरात मदतनिधीचे वितरण काही २०२२ मध्ये झाले. पण फक्त १००, ४००, ४०० रुपये एवढा मदतनिधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात प्राप्त झाला आहे.

यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. यंदा अतिवृष्टीमुळे कापूस पिकाची मोठी हानी झाली. सोयाबीनचे देखील ६० टक्क्यांवर नुकसान झाले. फक्त ज्वारी, मक्याचे काहीसे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती आले. कापूस पिकात अतिवृष्टीनंतर नोव्हेंबरच्या मध्यात गुलाबी बोंड अळीने नुकसान केले.

पिकांची अतोनात हानी झाली आहे. पण भरपाई प्राप्त झालेली नाही. शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम कसाबसा उभा केला आहे. पंचनामे, सरसकट भरपाई, कोकणच्या धर्तीवर मदत अशी आश्‍वासने अनेकदा लोकप्रतिनिधी व इतरांनी दिली. परंतु भरपाई न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

कापूस दर कमी असून, कापसाची खेडा खरेदी कमी दरात सुरू आहे. दुहेरी संकटांचा सामना शेतकरी करीत असल्याने मदतनिधीची आवश्यकता आहे. पण प्रशासन, शासन लक्ष देत नसल्याचा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

Papaya Mealybug Infestation: पपईवरील पिठ्या ढेकणाची वाढती समस्या

Ai in Rural Development: कृत्रिम बुद्धिमत्ता अन् ग्रामीण भारत

FPC Success Story: महिला शेतकरी कंपनीची भरारी !

Soybean Processing Success: सोयाबीन प्रक्रियेतून महिला गटाची प्रगती

SCROLL FOR NEXT