Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : नुकसानीला ‘एनडीआरएफ’च्या निकषापेक्षा जास्त भरपाई

Crop Damage Compensation : शेतकऱ्यांना मदत करताना नियम व निकष बाजूला ठेवून एनडीआरएफच्या निकषापेक्षा जास्त नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी हमी बुधवारी (ता. ४) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिली.

Team Agrowon

Latur News : शेतकऱ्यांना मदत करताना नियम व निकष बाजूला ठेवून एनडीआरएफच्या निकषापेक्षा जास्त नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी हमी बुधवारी (ता. ४) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिली.

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी उदगीर दौऱ्यावर आलेल्या शिंदे व फडणवीस यांनी हेर व लोहारा शिवारात बांधावर जाऊन शेतकऱ्यांसोबत संवाद साधत त्यांना धीर दिला. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचा विश्‍वासही त्यांनी या वेळी दिला.

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, क्रीडामंत्री संजय बनसोडे, माजी आमदार गोविंद केंद्रे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, तहसीलदार राम बोरगावकर उपस्थित होते. जिल्ह्यात २ सप्टेंबर रोजी ३२ महसूल मंडळालांत अतिवृष्टी झाली आहे. पिकांचे मोठे नुकसान झाले. यात काढणीला आलेल्या मूग व उडीद पिकांना मोठा फटका बसला तर सोयाबीनचेही नुकसान झाले.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत बुधवारी उदगीर येथे आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाला उपस्थित राहण्यासाठी श्री. शिंदे व उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी लागलीच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्याला प्राधान्य दिले. शेतकऱ्यांना एनडीआरएफचे निकष बाजूला ठेवून जास्तीत जास्त नुकसान भरपाई दिली जाईल. नुकसानीच्या काळातही शेतकऱ्यांना पूर्ण ताकदीने मदत केली जाईल, असे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

तसेच अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे वेगाने करून शेतकऱ्यांना लवकरात नुकसान भरपाई देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. उदगीर व जळकोट तालुक्यातील सर्व महसूल मंडलांत अतिवृष्टी झाल्याने सोयाबीन व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी दोघांना सांगितले. त्यावर तातडीने नुकसान भरपाईबाबत दोघांनी शेतकऱ्यांना आश्‍वस्त केले.

मराठवाड्यात अतिवृष्टी झाल्यानंतर लगेचच विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जिल्ह्यातही अतिवृष्टीने सोयाबीनसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे प्रत्यक्ष पाहणीमध्ये दिसून आले. सोयाबीन पिकामध्ये अजूनही पाणी साचलेले दिसत आहे.

यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत देण्यात येईल, असा विश्‍वास मुख्यमंत्री शिंदे यांनी शेतकऱ्यांशी दिला. अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT