Crop Compensation Agrowon
ॲग्रो विशेष

Khandesh Farmers: शेतकऱ्यांना पीक नुकसानीची भरपाई द्या ; खानदेश क्रांती शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Khandesh Farmers Compensation Demand : उडीद, मूग तर हातचे गेले. पपई पिकाचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना दिलासा म्हणून सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी खानदेश क्रांती शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

Team Agrowon

Khandesh Crop Damage Compensation: नंदुरबार जिल्ह्यात सर्वत्र परतीच्या पावसाने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. हाताशी आलेले कापूस पीक वाया गेले. मका पूर्णपणे खराब झाला. ज्वारी व बाजरी काळी पडू लागली. उडीद, मूग तर हातचे गेले.

पपई पिकाचे मोठे नुकसान झाले. शेतकऱ्यांना दिलासा म्हणून सरकारने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी खानदेश क्रांती शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

निवेदनात म्हटले आहे की, पावसामुळे जिल्ह्यातील शेतकरी हवालदील झाला आहे. प्रशासनाने तत्काळ शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पावले उचलली पाहिजे. मागील वर्षी पीकविम्याचे बऱ्याच शेतकऱ्यांचे पैसे बाकी आहेत.

तसेच, शेतकऱ्यांसाठी पाच हजार रूपये दुष्काळी अनुदान म्हणून देण्याची घोषणा सरकारने केली. त्यातही ५०-६० टक्के शेतकऱ्यांना पैसेमिळालेले नाहीत. फक्त केवायसीच्या नावाखाली अडवून ठेवले आहे.

आता शेतकऱ्यांना तत्काळ २५ टक्के पीकविमा कंपनीने नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्हास्तरावर तत्काळ समिती गठीत करण्यात यावी, यासाठी प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची भूमिका घेतली पाहिजे.

अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. या वेळी जितेंद्र पाटील, बिपीन पाटील, रवींद्र वळवी, प्रमोद पाटील, राजेंद्र बुवा, बाळासाहेब मोरे, योगेश पाटील, सागर पाटील, विरपाल गिरासे, मनोज चौधरी, प्रतीक पाटील, प्रणव पाटील, स्वप्निल पाटील, संदीप पाटील, उमाकांत पाटील, निलेश ठाकरे आदी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये सुधारणा, कापसाला आधार, आल्याचे भाव टिकून, मक्याची आवक स्थिर, भेंडीची आवक स्थिर

Weather Update: २८ जिल्ह्यात पावसाचा इशारा; तर तुरळक ठिकाणी गारपीटीची अंदाज

Crop Damage Compensation: कीड-रोगांमुळे पिकांचे मोठे नुकसान; शेतकऱ्यांना भरपाई मिळणार का? कृषिमंत्र्यांचा मोठा खुलासा

Labor Shortage: उष्णतेने मजूरटंचाई खानदेशात वाढली

Tapi Irrigation Project Issue: पाडळसे निम्न तापी सिंचन प्रकल्प रखडलेलाच

SCROLL FOR NEXT