Solar Pump  Agrowon
ॲग्रो विशेष

Solar Pump : शेतकऱ्यांच्या सौर पंपाची दुरुस्ती करण्यास कंपनीची टाळाटाळ; शेतकऱ्यांनी दिला इशारा

Delays Solar Pump Repairs : शेतकऱ्यांनी संबंधित कंपनीकडे तक्रार दाखल केली. परंतु सौर कृषी पंपाची कंपनी दखल घेत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची पिकं जळून खाक होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे दोन दिवसात सौर पंप दुरुस्त करून न दिल्यास कंपनी विरोधात ग्राहक मंचात नुकसान भरपाईची तक्रार करण्याकहा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे.

Dhananjay Sanap

Solar Pump Scheme : राज्य सरकारकडून सौर कृषी पंपाचा गाजावाजा केला जात आहे. परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मात्र सौर कृषी पंपातील फसवेगिरीमुळे जाच सहन करावा लागत असल्याचं दिसत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील मिरजगाव येथील सुधीर आखाडे आणि काशीनाथ क्षीरसागर या शेतकऱ्यांनी नोव्हेंबर २०२४ मध्ये सौर पंप शेतात बसवल्यानंतर अवघ्या दोन तासात बंद पडला.

शेतकऱ्यांनी संबंधित कंपनीकडे तक्रार दाखल केली. परंतु सौर कृषी पंपाची कंपनी दखल घेत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची पिकं जळून खाक होण्याची वेळ आली आहे. त्यामुळे दोन दिवसात सौर पंप दुरुस्त करून न दिल्यास कंपनी विरोधात ग्राहक मंचात नुकसान भरपाईची तक्रार करण्याकहा इशारा या शेतकऱ्यांनी दिला आहे.

राज्य सरकारकडून सौर कृषी पंपासाठी अनुदान दिलं जातं. दिवसा वीज भारनियमन आणि रात्रीच्या वीजपुरवठ्यामुळे शेतकरी वैतागून कृषी सौर पंपाला पसंती देत आहेत. परंतु पंपात बिघाड झाल्यास त्याची दुरुस्ती करण्यासाठी कंपनी वेळेत सेवा देत नाही. परिणामी शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे.

मिरजगावच्या या दोन्ही शेतकऱ्यांनी पंप बसवाला त्यावेळी पंप चालू होता. परंतु अवघ्या दोन तासात पंप बंद पडला. तसेच सौर कृषी पंपाचा रोटो सोल कंट्रोल बंद पडला. शेतकऱ्यांनी कंपनीकडे दोन्ही तक्रारी केल्या. मात्र शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत कंपनीला दोन दिवसांचा इशारा दिला आहे.

तर या नुकसानीसाठी जबाबदार असलेल्या कंपनीवर करावाई सरकारने करावी, मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, राज्यात सौर कृषी पंप मंजूर करून देतो, असं सांगून दललाकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जात आहे. तसेच राज्यातील विविध भागात सौर पंपाची दुरुस्ती करून देण्यास कंपन्या टाळाटाळ करत असल्याचं शेतकऱ्यांची तक्रार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT