Agriculture PG Admissions Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture PG Admissions : कृषी ‘पदव्युत्तर’ अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

Team Agrowon

Pune News : राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमधील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या १३८८ जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या शिक्षण विभागाचे संचालक डॉ. हरिहर कौसडीकर यांनी सांगितले, की कृषी परिषदेच्या https://www.mcaer.org/ या संकेतस्थळावर प्रवेश प्रक्रियेच्या अटी व नियमावलींची माहिती नमूद करण्यात आली आहे.

३० सप्टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेश अर्ज भरता येतील. त्यानंतर दोन ऑक्टोबरला अंतरिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. ३ ते ६ ऑक्टोबरदरम्यान तक्रार नोंदणी कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर आठ ऑक्टोबरला अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

पहिल्या प्रवेश फेरीच्या वाटप यादीची प्रसिद्धी ११ ऑक्टोबरला होत असून, १४ ते १५ ऑक्टोबर दरम्यान रिपोर्टिंगचा कालावधी देण्यात आला आहे. त्यानंतर १८ ऑक्टोबरला दुसऱ्या फेरीची यादी प्रसिद्ध होईल.

त्यासाठी २१ ते २२ ऑक्टोबरला रिपोर्टिंग कालावधी राहील. सर्व विद्यापीठांमधील रिक्त जागांची यादी २३ ऑक्टोबरला प्रसिद्ध होईल आणि २४ व २५ ऑक्टोबरला तिसरी प्रवेश फेरी होईल. पदव्युत्तर पदवीचे वर्ग २५ ऑक्टोबरपासून सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Conservation : जलसंधारणासह जयपूरची पर्यावरणात आघाडी

Green Soybean : हिरव्या सोयाबीनचा आहारात वाढवा वापर

World River Day : चला साजरा करूयात नद्यांचा उत्सव

NAFED Issue : नाफेडचा पर्याय शेतकऱ्यांच्या माथी मारू नका

Infestation Rice & Sugarcane : शेतकरी दुहेरी संकटात, भातावर खोड किड तर उसावर लोकरी माव्याचा प्रादुर्भाव

SCROLL FOR NEXT