Agriculture Inputs Agrowon
ॲग्रो विशेष

Fake Fertilizers : बनावट खते, बियाणे रोखण्यासाठी जिल्हाधिकारी घेणार पुढाकार

Agriculture Department : लातुर जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला असून खरीप पेरण्यांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे बोगस बियाणे व खतांची विक्री होऊ नये, यासाठी कृषी विभागाने दक्ष राहून काम करावे.

Team Agrowon

Latur News : लातुर जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला असून खरीप पेरण्यांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे बोगस बियाणे व खतांची विक्री होऊ नये, यासाठी कृषी विभागाने दक्ष राहून काम करावे. गरज पडल्यास आणखी भरारी पथके स्थापन करून कृषी सेवा केंद्रांची सतत तपासणी करावी.

मी स्वतःही केंद्राची तपासणी करणार असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी बुधवारी (ता. १२) सांगितले. बियाणे व खते हा शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय असून त्यावर त्यांचा संपूर्ण खरीप हंगाम अवलंबून असल्याने चांगल्या दर्जाचे बियाणे आणि खते उपलब्ध होण्यासाठी कृषी विभागाने सर्वतोपरी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी बजावले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी ठाकूर बोलत होत्या. जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आर. टी. जाधव, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी सुभाष झोले यांच्यासह उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी सेवा केंद्र असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.

पेरणी सुरू झाल्यानंतर बियाणे व खतांची मागणी वाढणार असून या काळात शेतकऱ्यांची अडवणूक व फसवणूक होऊ नये, यासाठी खबरदारी घ्यावी. बोगस बियाणे व खतांमुळे शेतकऱ्यांचा पूर्ण खरीप हंगाम वाया जाऊ शकतो. त्यामुळे जिल्ह्यात बोगस बियाणे, खते विक्रीला आळा घालण्यासाठी कृषी विभागाने दक्ष राहावे, आदी सूचना ठाकूर यांनी दिल्या.

बियाणे, खतांची जादा दराने होणारी विक्री व लिंकिंग करणाऱ्यांवर कारवाई करावी. शेतकऱ्यांना खत वापर व रासायनिक कीटकनाशकांच्या फवारणीबाबत मार्गदर्शन करावे. जिल्ह्यात फळबाग लागवड, बांबू लागवडीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे. यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानाची माहिती देऊन जास्त क्षेत्रावर फळबाग लागवडीसाठी प्रयत्न करावेत. नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये जिल्हास्तरीय सीताफळ महोत्सव आयोजित करून शेतकऱ्यांचा गौरव करावा. तृणधान्य लागवडीसाठीही प्रोत्साहन देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी ठाकूर यांनी दिल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, गवार भावात घसरण, पालक आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार तर डाळिंब दरात बदल

NCC Colonel Commandant Degree: कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना मानद ‘कर्नल कमांडंट’ पदवी

Analog Paneer Ban: राज्यात कृत्रिम (एनालॉग) पनीरवर वर्षभराची बंदी

Water Conservation: श्रमदानातून पाणीदार झाले ‘सालईबन’

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

SCROLL FOR NEXT