Vegetables Agrowon
ॲग्रो विशेष

Vegetable Market : थंडीचा हंगाम भाज्‍यांसाठी पोषक

Vegetable Updates : थंडीचा हंगाम सुरू असल्याने सध्या भाजीपाल्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मुंबईच्या घाऊक बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली असून दर नियंत्रणात आहेत.

Team Agrowon

Mumbai News : थंडीचा हंगाम सुरू असल्याने सध्या भाजीपाल्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मुंबईच्या घाऊक बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली असून दर नियंत्रणात आहेत.

थंडीचा हंगाम पिकांसाठी पोषक असतो. या काळात बाजारात चांगल्या भाज्या बघायला मिळतात. पालेभाज्यांपासून अगदी फळ भाज्यापर्यंत सर्वकाही ताजे असते. या काळात भाज्या लवकर खराब होत नाहीत. त्यामुळे राज्यात सर्वत्र निर्माण झालेला गारवा पोषक ठरत असल्यामुळे बाजारात भाजीपाल्याची आवक वाढली आहे.

सध्या सर्व प्रकारच्या फळभाज्यांचे घाऊक बाजारात ३० ते ४० रुपये किलोने मिळत आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारात ही भाज्या ४० ते ६० रुपये प्रतिकिलोला भाव मिळत आहे. भाज्‍यांचे दर आवाक्‍यात असले तरी लसणाला मात्र चांगला दर मिळत आहे.

अवकाळी पावसामुळे मध्यंतरी भाज्यांची आवक रोडावली होती. मात्र आता बाजारात मोठ्या प्रमाणावर भांज्याची आवक होत असल्याने भाज्यांचे दर स्थिर आहेत. तसेच, पालक, मेथी, कांदा पात, भेंडी, घेवडा यांची मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. हरभरा, बोर, पेरू, संत्रा, मोसंबी, पपई, केळी, सफरचंद या फळांचीही मोठ्या प्रमाणावर आवक होत आहे. स्ट्रॉबेरीचीही आवक जास्त होत असल्याने ग्राहक स्ट्रॉबेरी खरेदीला पसंती देत आहेत.

भाजी घाऊक किरकोळ

भेंडी २० ते ३८ ४० ते ५०

भोपळा १६ ते २० ३० ते ४०

फरसबी २० ते २६ ५० ते ६०

फ्लॉवर १४ ते १८ ५० ते ६०

घेवडा ३० ते ३५ ५० ते ६०

कारली २४ ते २८ ४० ते ६०

कोबी ८ ते १२ ३० ते ४०

ढोबळी २८ ते ४० ४० ते ६०

तोंडली ३० ते ३५ ५० ते ६०

वाटाणा ३० ते ४० ४० ते ५०

वांगी २० ते ३० ४० ते ५०

टोमॅटोचे दर चढेच

सर्व प्रकारच्या भाज्यांचे दर कमी होत असताना टोमॅटोचे दर मात्र वाढताना दिसत आहेत. घाऊक बाजारात टोमॅटो २५ ते ३५ रुपये किलो आहे; तर किरकोळ बाजारात ५० ते ६० रुपये किलो आहेत. काही दिवसांपूर्वी ३० ते ४० रुपये किलो असलेले टोमॅटोचे दर आठवडाभरात वाढल्याचे बाजारात चित्र आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT