Cyclone Biporjoy Agrowon
ॲग्रो विशेष

Cyclone Biporjoy : गणपतीपुळेत ‘बिपॉरजॉय’च्या प्रभावाने समुद्र किनारी नुकसान

Cyclone Biporjoy Update : बिपॉरजॉय चक्रीवादळाच्या प्रभावामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील किनारी भागात जाणवत आहे.

Team Agrowon

Ratnagiri News : बिपॉरजॉय चक्रीवादळाच्या प्रभावामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील किनारी भागात जाणवत आहे. गणपतीपुळे येथे रविवारी (ता. ११) सायंकाळी आलेल्या एका मोठ्या लाटेने किनाऱ्यावरील दुकानांचे नुकसान झाले.

तर गावखडी किनाऱ्याची धूप झाली असून सुरुची झाडे उन्मळून पडली आहेत. आरे-वारे किनारी रात्री उशिरा पाणी भरले होते. गुहागर, दापोलीत ही पाणी भरले होते, मात्र सुदैवाने नुकसान झालेले नाही.

बिपॉरजॉय चक्रीवादळ गुजरात, पाकिस्तानच्या मध्याकडे वळले असले तरीही त्याचे परिणाम कोकणातील किनाऱ्यावर दिसत आहेत. रविवारी (ता. ११) सायंकाळी ओहोटी सुरू असतानाही गणपतीपुळे येथे एक मोठी लाट आली आणि सर्वच दुकाने अस्ताव्यस्त करून टाकली.

किनाऱ्यावर फिरणाऱ्यांना पर्यटकांना धक्का बसला. सुदैवाने जीवितहानी झाली नाही; मात्र वाळूमधून धावताना काही पर्यटकांचे पाय मुरगळले, लाटेच्या वेगाने धक्क्यावर आपटलेल्या पर्यटकांनाही दुखापत झाली.

त्यातील चार जणांना उपचारासाठी जवळच असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. झाले. सुमारे दहा स्टॉल धारकांचे साहित्य वाहून गेले. सोमवारपासून किनाऱ्यावर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT