Cyclone Biporjoy : गणपतीपुळेमध्ये लाटांचा तांडव सुरूच ; पर्यटकांना बीचवर बंदी

Team Agrowon

चक्रीवादळामुळे लाटांचा तांडव

बिपॉरजॉय चक्रीवादळामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर सध्या लाटांचा तांडव सुरु आहे.

Cyclone Biporjoy | agrowon

धडकी भरली

ओहोटीवेळी समुद्राचे पाणी ओसरत होते. दरम्यान समुद्रात आनंद घेणाऱ्या पर्यटकांना अचानक अजस्त्र लाट दिसल्याने त्यांच्या मनात धडकी भरली.

Cyclone Biporjoy | agrowon

अजस्त्र लाटेमुळे तारांबळ

या लाट आल्याने पर्यटकांची मोठी तारांबळ उडाली. अनेक जण किनाऱ्याच्या दिशेने धावू लागले. यात महिला आणि लहान मुलं जखमी झाले आहेत

Cyclone Biporjoy | agrowon

५० प्रवासी जखमी

मोठ्या लाटेत सुमारे ५० पेक्षा जास्त पर्यटक किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. सुदैवाने यात कोणीही जिवितहानी झाली नाही.

Cyclone Biporjoy | agrowon

दुकानांचे नुकसान

या लाटांचे पाणी किनाऱ्यावरील दुकानात शिरले. त्यामुळे काही दुकानांचेही मोठे नुकसान झाले आहे.

Cyclone Biporjoy | agrowon

सुरक्षित ठिकाणी स्टाॅल

सुमारे पंधरा स्टॉल धारकांनी किनाऱ्यावर सुरक्षित ठिकाणी स्टॉल उभारले होते.

Cyclone Biporjoy | agrowon

समुद्रात जाण्यास मज्जाव

हा प्रकार झाल्यानंतर पोलिस प्रशासन, जीवरक्षकांनी समुद्रात कुणालाही न जाऊ देण्याचा निर्णय घेतला आहे.

Cyclone Biporjoy | agrowon

बीच पर्यटकांसाठी बंद

आता गणपतीपुळे ग्रामपंचायत प्रशासनाने हा बीच पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Cyclone Biporjoy | agrowon
navneet rana | agrowon
आणखी पहा