cm eknath shinde agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Farmer : मुख्यमंत्र्यांचा शेतकरी संघटनांना शब्द ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अतिरिक्त पैसे देणार

Kolhapur Farmers : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग १० तास रोखून धरला होता.

sandeep Shirguppe

Eknath Shinde vs Raju Shetti : गतवर्षी तुटलेल्या ऊसाला दुसरा हप्ता ४०० रूपये मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग १० तास रोखून धरला होता.

यावेळेस कोल्हापूरचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनुसार साखर कारखान्यांना शेतकऱ्यांच्या खात्यावर एक आठवड्यात पैसे जमा करण्यास तातडीने मान्यता देण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे केली.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, पुढच्या दोन दिवसांत राज्याचे मुख्य सचिव यांना सांगून ऊस दर नियंत्रण समितीची बैठक पुढच्या दोन दिवसात घेण्यात येईल. यामध्ये शेतकऱ्यांना पैसे देण्याबाबत आम्ही मान्यता देऊ असे मुख्यमंत्री म्हणाल्याचे स्वाभिमानीच्या शिष्टमंडळाकडून सांगण्यात आले. तसेच शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूरी देवून खात्यावर वर्ग करणार असल्याचीही ग्वाही त्यांनी दिली.

गत हंगामामध्ये ज्या साखर कारखान्यांनी ३ हजार रूपयापेक्षा कमी दर दिला आहे त्या कारखान्यांना प्रतिटन १०० रूपये व ज्या कारखान्यांनी ३ हजार रूपयापेक्षा जादा दर दिला आहे. त्यांना प्रतिटन ५० रूपये प्रतिटन देण्याचा तोडगा सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी मान्य केलेला आहे.

याबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केले असून शासनाने ऊस दर नियंत्रण समितीची बैठक घेऊन तातडीने वरीलप्रमाणे साखर कारखान्यांना गत हंगामातील दुसरा हप्ता देण्यासंदर्भातील निर्णयास मान्यता देण्यात यावी अशी मागणी स्वाभिमानीकडून करण्यात आली आहे.

त्याबरोबरच शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेतील व नियमीत कर्जदारांच्या प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनी केवायसी व अटीची पूर्तता केल्याने तातडीने त्यांचे प्रोत्साहनपर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी करण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT