Water Resource Department agrowon
ॲग्रो विशेष

Water Resource Department : जलसंपदा विभागाच्या १२५ प्रकल्पांसाठी ८० हजार कोटींची प्रशासकीय मान्यता : मुख्यमंत्री शिंदे

Department of Water Resources Project : राज्यात शेतीला पाणी उपलब्ध होण्यासाठी जलसंपदा विभागाच्या १२५ प्रकल्पांसाठी ८० हजार कोटींच्या सुधारित प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

sandeep Shirguppe

Maharashtra Water Department : राज्यात शेतीला पाणी उपलब्ध होण्यासाठी जलसंपदा विभागाच्या १२५ प्रकल्पांसाठी ८० हजार कोटींच्या सुधारित प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. कोल्हापूर जिल्ह्यातील धामणी (राधानगरी) येथे बुधवार (ता.०९) धामणी प्रकल्पाच्या घळ भरणी कामाच्या शुभारंभप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यातील धामणी धरण प्रकल्पाच्या घळ भरणीच्या कामामुळे चार टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. धामणीच्या चार टीएमसी पाण्यामुळे हजारो शेतकऱ्यांची तहान भागेल व शेतीलाही पाणी उपलब्ध होईल. शासनाने गेल्या अडीच वर्षात राज्यामध्ये अनेक प्रकल्प राबविले आहेत. जनतेसाठी अनेक लोककल्याणकारी निर्णय घेतले असल्याचे शिंदे म्हणाले.

शिंदे पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, लखपती दीदी योजना, युवा कार्य प्रशिक्षण योजना, साडेसात एचपी पर्यंत कनेक्शन असणाऱ्या शेतकऱ्यांना मोफत वीज योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अशा अनेक योजना सुरु केल्या आहेत. आणि मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातून पहिली रेल्वेगाडी तीर्थदर्शनासाठी सोडण्यात आली. शिक्षणासाठी मुलींना शंभर टक्के फी माफी योजनाही राबविण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, माजी खासदार संजय मंडलिक, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जलसंपदा विभागाचे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, तहसीलदार अनिता देशमुख, कोल्हापूर विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे, कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, कार्यकारी अभियंता के. डी. शिंदे, कार्यकारी अभियंता शिल्पा मगदूम राजे, उपशाखा अभियंता संजय पाटील यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT