Cloudy Weather Agrowon
ॲग्रो विशेष

Cloudy Weather : पूर्व विदर्भातील जिल्ह्यात ढगाळ वातावरण

Weather Update : पश्चिम विदर्भात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झाले असताना पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते.

Team Agrowon

Nagpur News : पश्चिम विदर्भात गारपीट आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झाले असताना पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. अमरावती जिल्ह्याच्या काही भागात तुरळक पावसाने हजेरी लावल्याचे वृत्त आहे.

मात्र पावसाचा जोर अपेक्षित नसल्याने नुकसान झाले नाही. पश्चिम विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली. त्यासोबतच काही जिल्ह्यांमध्ये गारपीट झाल्याने त्याचा रब्बी पिकांना मोठा फटका बसला.

पूर्व विदर्भात मात्र ढगाळ वातावरण अनुभवण्यात आले. परिणामी या भागात नुकसानीची तीव्रता नव्हती. परंतु ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा ही पिके काढण्यास आल्याने त्याचा दर्जा खालावण्याची भीती वर्तविली जात आहे.

अमरावती जिल्ह्याच्या वरुड, मोर्शी परिसरांत काही भागामध्ये तुरळक पावसाची नोंद करण्यात आली आहे. या भागात संत्रा बागा आहेत. मृग बहारातील फळांना या पावसामुळे नुकसान होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

सध्या हरभरा परिपक्‍व होत काढणीस आला आहे. काही शेतकऱ्यांनी कापणी, मळणी आटोपली आहे तर काहींची काढणी शिल्लक आहे. त्यासोबतच गव्हाची प्रत खराब होण्याची शक्‍यता आहे. त्याचा बाजारावर परिणाम होईल. तुरीची काहींनी गंजी लावली आहे. त्याचीही प्रत खराब होणार आहे.
प्रमोद यादगीरवार, सहयोगी संशोधन संचालक, मध्य-विदर्भ विभागीय कृषी संशोधन केंद्र, यवतमाळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Fertiliser Linking : उत्तर प्रदेशच्या धर्तीवर खत लिकिंगसाठी महाराष्ट्रात नवा नियम आणणार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची विधानसभेत माहिती

Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

Blight Disease: बदलत्या वातावरणात करपा रोगाची शक्यता

Raju Chaudhari Success Story: कडा ते कॅनडा

Nilesh Rane: कोकणातील आंबा, काजू बागायतदारांच्या मदत प्रश्नी निलेश राणेंनी कृषीमंत्र्यांना घेरले

SCROLL FOR NEXT