Vineyard  Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Farming : ढगाळ वातावरणाचा द्राक्ष बागांना फटका

Vineyard : या बदलत्या वातावरणामुळे प्रत्येक अवस्थेतील बागांना अडचणीत आल्या आहेत.त्यातच सकाळी रिमझिम पावसामुळे द्राक्ष बागांतील अडचणीत वाढ झाल्या आहेत.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागांमध्ये अळी आणि विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढणार आहे. या बदलत्या वातावरणामुळे प्रत्येक अवस्थेतील बागांना अडचणीत आल्या आहेत.त्यातच सकाळी रिमझिम पावसामुळे द्राक्ष बागांतील अडचणीत वाढ झाल्या आहेत.

यंदा तर सततच्या सहा - सात महिन्यात पडलेल्या पावसामुळे द्राक्षवेलीला पुरेसा सुर्यप्रकाश मिळाला नाही. अतीपावसामुळे पांढरी मुळी सुटली नाही. त्यामुळे द्राक्षवेलीला असलेली काडी परिपक्व झाली नाही.

सहाजिकच पीक छाटणीनंतर द्राक्षवेलीला द्राक्ष घडांचे प्रमाण अतिशय कमी आहे. तर काही द्राक्षबागांमध्ये तुरळक प्रमाणात द्राक्षघड असल्याने यावर्षी द्राक्षबाग सोडूनच दिली आहे. त्यामुळे आतापर्यंत केलेला खर्च वाया जाऊन द्राक्ष बागायतदार तोट्यात आला आहे.

जिल्ह्यात गेल्या गेल्या चार - पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे उर्वरित द्राक्षबागांना फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ढगाळ वातावरणामुळे अळी आणि डाऊनी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. त्यातच पहाटे साडेचार वाजल्यापासून सात वाजेपर्यंत रिमझिम पावसाने हजेरी लावली.

यामुळे डाऊनीचा प्रादुर्भाव वाढणार आहे. तसेच काढणीला आलेली द्राक्ष क्रॅकिंग, फुलोरावस्थेत असलेल्या बागांमध्ये कुज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी आणखीच संकटात सापडला आहे.

यंदा द्राक्ष हंगाम सुरु झाल्यापासून पावसाचे संकट होते. मधल्या काळात पोषक वातावरण असल्याने बागा चांगला फुलल्या होत्या. मात्र, ढगाळ वातावरणामुळे रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने संकट ओढावले आहे.
- विनायक पाटील, द्राक्ष उत्पादक शेतकरी, वायफळे, ता. तासगाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sunflower Farming: कमी कालावधीच्या सूर्यफूल वाण पेरणीस पसंती

Subsidized Electricity Scheme: कृषिपूरक व्यवसायांना लवकरच सवलतीच्या दराने वीज

Watermelon Harvesting: गोड, दर्जेदार कलिंगडांसाठी उन्हाळ्यात काळजी आणि योग्य वेळी काढणी गरजेची

Agri Administration Discussion: नव्या गुणनियंत्रण संचालकाची चर्चा

Ujani Dam Water Release: उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडले

SCROLL FOR NEXT