Seena Dam  Agrowon
ॲग्रो विशेष

Seena Dam : अहिल्यानगर जिल्ह्यातील सीना धरण ‘ओव्हर फ्लो’

Dam Water Storage : मे महिन्यात अहिल्यानगर, पारनेर, कर्जत तालुक्यांत झालेला जोरदार पाऊस. अकोळनेर, खडकी, वाळकी अन्य भागातील ढगसदृश्य पाऊस यामुळे सीना धरणात मोठ्‍या प्रमाणात पाणी जमा झाले.

Team Agrowon

Ahilyanagar News : मे महिन्यात अहिल्यानगर, पारनेर, कर्जत तालुक्यांत झालेला जोरदार पाऊस. अकोळनेर, खडकी, वाळकी अन्य भागातील ढगसदृश्य पाऊस यामुळे सीना धरणात मोठ्‍या प्रमाणात पाणी जमा झाले.

अडीच टीएमसी क्षमतेचे धरण शनिवारी (ता. १४) पहाटे ओव्हरफ्लो झाल्याने सांडव्यावरू पाणी वाहू लागले आहे. इतिहासात पहिल्यांदाच जूनच्या सुरुवातीला हे धरण भरले आहे. सीना नदीवर निमगाव गांगर्डा (ता. कर्जत) येथे असलले सीना धरण अडीच टीएमसी पाणीसाठवण क्षमतेचे आहे.

या धरणाचा श्रीगोंदा, कर्जत, जामखेड व आष्टी तालुक्यांतील अनेक दुष्काळी गावांना फायदा होतो. अहिल्यानगर, पारनेर, कर्जत तालुक्यात झालेल्या पावसाने या धरणा पाणी जमा होते.

मात्र हा दुष्काळी भाग असून धरणाच्या पाणलोटात पावसाचे प्रमाण कमी असल्याने पावसाळ्याच्या शेवटी हे धरण भरते. अनेक वेळा तर संपूर्ण पावसाळ्यातही सीना धरण भरलेले नाही. यंदा मात्र मे महिन्यात जोरदार पाऊस झाला.

अहिल्यानगर, पारनेर, कर्जत तालुक्यात जोरदार पाऊस झाला. शिवाय अहिल्यानगर तालुक्यातील अकोळनेर, खडकी, वाळकी, चास, कामरगाव, व परिसरातील पंधरा गावांत ढगफुटीसदृश पाऊस यामुळे सीनेला मोठा पूर आल्याने सारे पाणी सीना धरणात जमा झाले. त्याचा परिणाम म्हणून यंदा सीना धरण पावसाळा सुरू होण्याआधीच भरले असून लाभक्षेत्रातील दुष्काळी भागात शेतकरी उत्साहित झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Farming : कापूस उत्पादन वाढीसाठी मूलभूत टिप्स

Onion Season : रांगडा हंगामात कांदा उत्तम पर्यायी पीक

Marathwada Water Storage : मराठवाड्यातील अकरा मोठ्या प्रकल्पांतील पाणीसाठा ३५ टक्क्यांवर

Kharif Sowing : पावसाच्या दडीमुळे पेरणी अजूनही साठीतच

Antimicrobials in Livestock : पशुपालनासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांवर केंद्र सरकारने घातली बंदी

SCROLL FOR NEXT