Water Conservation Agrowon
ॲग्रो विशेष

POCRA 2.0 : ‘पोकरा’अंतर्गत जांब खुर्दमध्ये श्रमदानातून समतल चर खोदकाम

Water Conservation : पोकरा २.० अंतर्गत निवड झालेल्या गावांमध्ये मृदा व जलसंधारणाच्या कामांवर भर देण्यात येत आहे. जांब खुर्द (ता. जिंतूर) येथे बुधवारी (ता. ३०) रात्री गावातून मशाल फेरी काढण्यात आली.

Team Agrowon

Parbhani News : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प २.० (हवामान अनुकूल कृषी प्रकल्प-पोकरा २.०) अंतर्गत जांब खुर्द (ता. जिंतूर) येथे सूक्ष्म नियोजन प्रक्रिया सुरु असून यात ग्रामसभा, मशाल फेरी, श्रमदान यांचा समावेश आहे.

गुरुवारी (ता. १) महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त दुष्काळ निवारणासाठी मृदा जलसंधारणाच्या उपाययोजना अंतर्गंत शेतकरी ग्रामस्थ, कर्मचाऱ्यांच्या श्रमदानातून २१० घनमीटर सलग समतळ चर खोदकाम करण्यात आले. त्यामध्ये पाणी साचून भूजलपातळी वाढण्यास मदत होणार आहे.

पोकरा २.० अंतर्गत निवड झालेल्या गावांमध्ये मृदा व जलसंधारणाच्या कामांवर भर देण्यात येत आहे. जांब खुर्द (ता. जिंतूर) येथे बुधवारी (ता. ३०) रात्री गावातून मशाल फेरी काढण्यात आली. त्यानंतर आयोजित ग्रामसभेत कृषी सहायक गजानन राठोड, मंडळ कृषी अधिकारी किशोर शेळके यांनी पोकरा बाबत माहिती शेवडी (ता. जिंतूर) येथील प्रगतशील शेतकरी शिवाजी सानप यांनी शेवडी येथील जलसंधारणाची यशोगाथा सांगितली. सूत्रसंचालन सुभाष पिंपळकर यांनी केले.

गुरुवारी (ता. १) सकाळी ७ ते १० यावेळेत गावातील महिला, पुरुष शेतकरी, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी मिळून तीनशेवर व्यक्तींनी सलग तीन तास श्रमदान केले. या सामूहिक श्रमदानातून २१० घन मीटर क्षमतेचे सलग समतल चर खोदण्यात आले.

पोकराचे प्रकल्प संचालक परिमल सिंह, मृदा व जलसंधारण तज्ज्ञ विजय कोळेकर यांनी ग्रामस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी श्रमदान केले. सरपंच सुनीता बापूराव चौरे, उपविभागीय कृषी अधिकारी नित्यानंद काळे, तालुका कृषी अधिकारी लक्ष्मण शिंदे, तंत्राधिकारी प्रशांत सिरस, गजानन राठोड, शेतकरी उपस्थित होते.

लोकसहभागातून पोकरा प्रकल्प यशस्वी होणार आहे.जांब खुर्द येथील ग्रामस्थांनी पाणलोट क्षेत्र विकासासाठी घेतलेला पुढाकार इतर गावांसाठी प्रेरणादायी आहे. शेतीपूरक व्यवसायाच्या अंगीकारातून शेतकरी स्वावलंबी होतील. सूक्ष्म नियोजन प्रक्रियेत सक्रिय सहभागी होऊन आपल्या गावाच्या समृद्धीसाठी विकास आराखडा तयार करावा.
परिमल सिंह, प्रकल्प संचालक, पोकरा, मुंबई

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT