Climate Change Agrowon
ॲग्रो विशेष

Climate Change : हवामान बदल उभयचरांसाठी जीवघेणा

Climate Change Crisis In India : हवामान बदलामुळे जगभरातील उभयचर प्रजातींवर संकट निर्माण झाले असून, यांपैकी अनेक प्रजाती नष्ट होत असल्याचे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

Team Agrowon

Latest Agriculture News : हवामान बदलामुळे जगभरातील उभयचर प्रजातींवर संकट निर्माण झाले असून, यांपैकी अनेक प्रजाती नष्ट होत असल्याचे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. नेचर जनरलमध्ये याबाबतचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे.

या प्रजाती पृष्ठवंशीय प्रजातींमधील अस्तित्व धोक्यात असलेल्या प्रजातींमध्ये अग्रस्थानी असल्याचे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. यामध्ये भारतातील किमान १६८ प्रजातींचा समावेश आहे.

भारतातील ४२६ उभयचर प्रजातींपैकी किमान १६८ प्रजातींचे अस्तित्व धोक्यात असल्याचे या संशोधनातून समोर आले आहे. आंतरराष्ट्रीय वैज्ञानिकांच्या एका मोठ्या गटाने याबाबत संशोधन केले आहे.

या गटामध्ये हैदराबादच्या काऊन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रिअल रिसर्च सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलेक्यूलर (सीएसआयआर-सीसीएमबी) या संस्थेसह विविध संस्थांच्या शास्त्रज्ञांचा समावेश आहे. भारतातील पश्‍चिम घाटावर उभयचरांच्या विविध प्रजाती मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. या प्रजातींचे अस्तित्व हवामान बदलामुळे धोक्यात आले असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर २००४ मध्ये उभयचर प्राण्यांबाबत पाहणी करण्यात आली तेव्हा पहिल्यांदा या प्रजातींचे अस्तित्व धोक्यात असल्याची आकडेवारी समोर आली होती. त्यानंतर त्या माहितीच्या आधारे जगभरातील उभयचर प्राण्यांच्या प्रजातींच्या संवर्धनासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

मागील वर्षी जून महिन्यामध्ये झालेल्या पाहाणीवेळीही ऊभयचर प्राण्यांच्या सुमारे ४० टक्के प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे असून, या मागील कारण हे रोगांपेक्षाही अधिक हवामान बदल असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

१९८० ते २०२२ पर्यंत उभयचर प्राण्याच्या एकूण ३७ प्रजाती जवळपास नामशेष झाल्या असल्याचा शास्त्रज्ञांना दावा आहे. त्यामुळे उभयचर प्राण्याच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर तातडीने उपाययोजना राबवायला हव्या आहेत, असे आवाहन शास्त्रज्ञांनी केले आहे.

नामशेष होण्याच्या मार्गावरील भारतातील प्रजातींची संख्या

राज्याचे नाव... एकूण... नामशेष होणाऱ्या प्रजाती

केरळ... १७८... ८४

तमिळनाडू... १२८... ५४

कर्नाटक... १००... ३०

एकूण ४२६ पैकी १३६ प्रजाती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dearness Allowance Hike: शासकीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; महागाई भत्ता ५५ वरून ५८ टक्के

Flame Of The Forest: वसंत ऋतूतनिसर्गाचा रंगोत्सव

Shaktipith Highway: शेतकऱ्यांचा पुन्हा एल्गार, शक्तिपीठ महामार्ग रद्द करा

Anti Corruption Trap: लाच घेताना मोरोचीच्यामहिला ग्रामसेविकेला पकडले

Ujani Dam: समन्वयाअभावी तीन टीएमसी पाण्याचा अपव्यय

SCROLL FOR NEXT