Radhakrishna Vikhe Patil Agrowon
ॲग्रो विशेष

Radhakrishna Vikhe Patil : स्वच्छता मोहीम ही लोकचळवळ व्हावी : विखे

Radhakrishna Vikhe Patil : ‘‘जिल्ह्यात धार्मिक स्थळे, शहरे व ग्रामीण भागात सखोल स्वच्छता मोहीम राबवावी. तसेच निरंतर व सातत्यपूर्ण स्वच्छतेसाठी सफाई मोहीम ही लोकचळवळ व्हावी,’’ असे आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

Team Agrowon

Akola News : ‘‘जिल्ह्यात धार्मिक स्थळे, शहरे व ग्रामीण भागात सखोल स्वच्छता मोहीम राबवावी. तसेच निरंतर व सातत्यपूर्ण स्वच्छतेसाठी सफाई मोहीम ही लोकचळवळ व्हावी,’’ असे आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

शहरी व ग्रामीण भागात, तसेच धार्मिक स्थळांमध्ये स्वच्छता अभियान राबविणे, महिला सशक्तीकरण अभियान आदींबाबत आढावा बैठक बुधवारी (ता.१७) पालकमंत्री श्री. विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. महापालिका आयुक्त कविता द्विवेदी, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू शरद गडाख, निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील व विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

विखे म्हणाले, ‘‘अयोध्या येथे सोमवारी (ता.२२) श्री राम मंदिरात प्राण प्रतिष्ठापना होणार आहे. यानिमित्त शहरी, तसेच ग्रामीण भागात सखोल स्वच्छता मोहीम राबवावी. परिसरात निर्माण होणाऱ्या कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी यंत्रणा, ओला, सुका कचरा वर्गीकरण यादृष्टीने आवश्यक तरतुदी व्हाव्यात.

निरंतर स्वच्छतेसाठी त्याबाबत प्रभावी जनजागृती व्हावी. सुशोभीकरणाची कामे राबवावीत. मंदिर परिसरातही विशेष स्वच्छता मोहीम राबवून विद्युत रोषणाई करावी. गावोगाव प्रभातफेरी, रांगोळ्या असे उपक्रम लोकसहभाग मिळवून व्हावेत. रोषणाईसाठी मंदिरांना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी द्यावा.’’

३६ वाळूघाटांसाठी ११ डेपो निश्चित

शासनाच्या नविन वाळू धोरणानुसार जिल्ह्यातील ३६ वाळूघाटांसाठी ११ डेपो निश्चित केले आहेत. त्याची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात मंजूर मूर्तिजापूर तालुक्यातील ताकवाडा डेपोसाठी सागर बजाज यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते कार्यारंभ आदेश देण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : कोकणातील शेतकऱ्यांना लवकरच मिळणार नुकसान मदत आणि भरपाई; कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत ग्वाही

Organic Farming Story: आघातांनीच दाखविला आरोग्यदायी शेतीचा मार्ग

India Biofortified Crops: जैवसंपोषण : आर्थिक विकासाची किल्ली

Pulses Procurement Challenges: थेट खरेदीच्या वल्गना

Water Lifting Ban: कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात उद्यापर्यंत उपसाबंदी शिथिल

SCROLL FOR NEXT