Citrus fruits agrowon
ॲग्रो विशेष

Citrus fruits : लिंबूवर्गीय फळपिकांसाठीच्या सिट्रस इस्टेटसाठी कोट्यावधींचा निधी

Citrus Estate : सिट्रस इस्टेटसाठी ७ कोटी २४ लाख ६७ हजार रुपयांच्या निधीस मंजूरी देण्यात आली आहे.

sandeep Shirguppe

Maharashtra Farmers : जिल्हा मध्यवर्ती रोपवाटिका उमरखेड, अमरावती, सिट्रस इस्टेट, धिवरवाडी, नागपूर, सिट्रस इस्टेट तळेगाव, वर्धा येथील शासकीय तालुका फळरोपवाटिकांमध्ये लिंबूवर्गीय फळपिकांकरिता सिट्रस इस्टेट स्थापन करण्यात आली आहे. या सिट्रस इस्टेटसाठी ७ कोटी २४ लाख ६७ हजार रुपयांच्या निधीस मंजूरी देण्यात आली आहे.

सिट्रस इस्टेटसाठीच्या या निधीचे वितरण पुढील प्रमाणे होणार आहे. उच्चतंत्रज्ञान आधारीत रोपवाटीका स्थापन करण्यासाठी ३५ लाख ६५ हजार रुपये, त्यापैकी ६ लाख १५ हजार रुपये धिवरवाडी ता.काटोल, जि. नागपूरसाठी तर २९ लाख ५० हजार रुपये तळेगाव ता. आष्टी. जि. वर्धासाठी वितरित करण्यात येणार आहे.

उमरखेड, ता. मोर्शी, जि. अमरावती येथील सिट्रस इस्टेटसाठी प्रशासकीय इमारत बांधकाम, कार्यालय, प्रयोगशाळा, प्रशिक्षण भवन, निविष्ठा विक्री केंद्र इत्यादीसाठी १ कोटी, तिन्ही सिट्रस इस्टेटमध्ये अवजारे बँक स्थापनेसाठी २ कोटी १४ लाख, माती, पाणी, उती व पाने चाचणी प्रयोगशाळा आणि जिवाणू खते उत्पादनासाठी लागणाऱ्या साहित्यासाठी ३ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

या सिट्रस इस्टेटचे कृषी आयुक्तालय स्तरावर कृषी आयुक्त, पुणे, विभाग स्तरावर विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती, नागपूर आणि छत्रपती संभाजी नगर आणि जिल्हा स्तरावर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, अमरावती, नागपूर, वर्धा, छत्रपती संभाजी नगर हे सनियंत्रण करणार असल्याचे कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने कळविले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT