Water Agrowon
ॲग्रो विशेष

Water shortage : पाण्यासाठी पायपीट थांबणार

सध्या प्रकल्पातील साठ्यामुळे पाणीटंचाईचे चटके बसणार नाही, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Team Agrowon

Yavtmal Water News : जिल्ह्यात गतवर्षी वार्षिक सरासरीच्या तुलनेत दुप्पट पाऊस (Rain) झाला. त्यामुळे आजघडीला तीन मोठ्या, सात मध्यम आणि ८५ लघू प्रकल्पांत मुबलक जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे यावर्षी उन्हाळ्यात नागरिकांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबणार, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळ्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. कधी हा दुष्काळ कृत्रिम असतो, तर कधी नैसर्गिक मागील वर्षी चांगला पाऊस झाल्याने यंदा नदी, नाले व प्रकल्पात बराच जलसाठा शिल्लक आहे.

परंतु, दरवर्षी, शेतकऱ्यांपासून ते मुक्या प्राण्यांनाही याची झळ सोसावी लागली. गेल्या वर्षी जिल्ह्यातील काही भागातील नागरिकांना थोड्या प्रमाणात टंचाईचे चटके सोसावे लागले. जीवन प्राधिकरण आणि ग्रामपंचायतींचे नळ हे आठवड्यातून दोन ते तीन दिवसच सोडत असल्याचे चित्र होते.

अनेकांना तर पाण्यासाठी रात्रंदिवस दूरवरून पाणी आणावे लागत होते. तर लघू जलाशय कोरडे झाले होते. यावर्षी उन्हाळ्याच्या मार्च, एप्रिल तसेच मेमध्ये नागरिकांना पाण्याची चणचण भासणार नसल्याचे तरी सध्या सांगितले जात आहे.

जिल्ह्यात पूस, अरुणावती आणि बेंबळा हे तीन मोठे प्रकल्प आहेत. सायखेडा, गोकी, वाघाडी, बोरगाव, लोअरपूस, अडाण आणि नवरगाव असे सात मध्यम प्रकल्प आहेत. पाटबंधारे विभागाचे ७४ आणि महामंडळाचे ११ असे एकूण ८५ लघू प्रकल्प आहेत.

सध्या प्रकल्पातील साठ्यामुळे पाणीटंचाईचे चटके बसणार नाही, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

टंचाई आराखडा कमी

दुर्गम भागातील गाव, वस्ती, पोड अशा ठिकाणी पाणीपुरवठा करण्यासाठी प्रशासनाकडून पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे.

गेल्या दोन वर्षांतील आकडेवारी पाहता यंदाचा आराखडा कमी आहे. त्यामुळे यंदा पाणीटंचाईची समस्या कमी जाणवणार अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

AI in Sugarcane Farming: सुरु उसाला एआयची जोड देऊन उत्पादन कसे वाढवता येईल?

PoCRA Phase 2: नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाच्या (पोकरा) दुसऱ्या टप्यासाठी १०० कोटी ६६ लाख रुपयांचा निधी मंजूर

Indigenous Variety: आईच्या जपवणुकीला मुलाच्या प्रयोगाची साथ; गावरान वाणाची राष्ट्रीय नोंद

Rural Development: ‘बीडीओं’नी आठवड्यात १० गावांना भेटी द्याव्यात

Shivendrasinghraje Bhosale: वार्षिक योजनेतील निधी अखर्चित ठेवू नका

SCROLL FOR NEXT