PM Suryaghar Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

PM Suryaghar Scheme : सूर्यघर योजनेच्या प्रसिद्धीसाठी ‘महावितरण’चा चित्ररथ

Publicity of Suryaghar Yojana : पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेची घराघरांत पोहोचविण्यासाठी महावितरणकडून चित्ररथ तयार करण्यात आला आहे.

Team Agrowon

Solapur News : पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजनेची घराघरांत पोहोचविण्यासाठी महावितरणकडून चित्ररथ तयार करण्यात आला असून, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व महावितरणचे कार्यकारी संचालक (विशेष योजना) धनंजय औंढेकर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून हा चित्ररथ जिल्ह्यात मार्गस्थ झाला.

अक्षय ऊर्जेचा स्रोत असलेल्या सूर्यापासून मिळणाऱ्या सौर विजेच्या प्रत्येक कुटुंबाला विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने ‘पंतप्रधान सूर्यघर-मोफत वीज योजना’ जाहीर केली आहे. या योजनेच्या माध्यमातून कुटुंबांना आपल्या वीजबिलात शंभर टक्क्यांपर्यंत बचत करता येईल,

तसेच शिल्ल्क वीज महावितरणला देऊन अतिरिक्त उत्पन्न मिळवता येईल. तर दुसरीकडे मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिवसा व मोफत वीज मिळेल. या दोन्ही योजनांचा फायदा घरगुती व शेतकरी ग्राहकांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.

या वेळी महावितरणचे कार्यकारी संचालक (विशेष योजना) धनंजय औंढेकर, अधीक्षक अभियंता सुनील माने, कार्यकारी अभियंता आशिष मेहता व कार्यकारी अभियंता रमेश राठोड, अतिरिक्त कार्यकारी अभियंता राजेश मदने यांच्यासह महावितरणचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने छतांवर सूर्यघर योजनेसाठी १ कोटी सूर्यघरांचे लक्ष ठेवले आहे. या योजनेअंतर्गत एक किलोवॅटसाठी ३० हजार, २ किलोवॅटसाठी ६० हजार तर ३ किलोवॅट व त्यापुढील क्षमतेच्या सौरप्रकल्पासाठी ७८ हजारांचे अनुदान दिले जाणार असल्याची माहिती महावितरणचे कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर यांनी दिली.

पीएम-सूर्य घर मोफत वीज योजना, पीएम कुसुम सोलार, मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना यासह अन्य सौर योजनांबाबत कार्यकारी संचालक धनंजय औंढेकर यांनी महावितरणच्या सर्वच कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच बैठक घेतली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT