Chinese Garlic Agrowon
ॲग्रो विशेष

Chinese Garlic : चिनी लसणाची एपीएमसीत घुसखोरी

APMC Update : सरकारकडून चिनी मालावर बंदी आणण्यात आली असली तरीही एपीएमसीत चिनी लसणाची आवक वाढल्‍याचे दिसते.

Team Agrowon

Washi News : सरकारकडून चिनी मालावर बंदी आणण्यात आली असली तरीही एपीएमसीत चिनी लसणाची आवक वाढल्‍याचे दिसते. चिनी लसूण भारतीय बाजारात घुसखोरी करत असून आकाराने मोठा, सोलण्यास सोपा असल्याने बाजारात भाव खाऊन जात आहे. त्यामुळे भारतीय देशी लसणाच्या किमतीवर परिणाम होत असल्याने शेतकरी आणि व्यापाऱ्यांची चिंता सध्या वाढली आहे.

चीनमधून भारतात मोठ्या प्रमाणात कृषिमालाची आयात होते. मात्र मागील काही काळापासून भारत आणि चीन या दोन्ही देशांतील संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे भारताकडून चिनी मालावर ५-६ वर्षांपासून बंदी घालण्यात आली आहे. असे असले तरी छुप्या मार्गाने भारतीय बाजारपेठेत चिनी माल येत आहे. नेपाळ, अफगाणिस्तान, तुर्कस्तानवरून बिहार आणि जम्मूमार्गे चिनी लसणाची तस्करी करून तो देशभरातील बाजारात आणला जात असल्याचे व्यापारी सांगतात.

कसे ओळखावे?

चिनी लसणाच्या पाकळ्या हाताच्या अंगठ्या एवढ्या असतात; तर भारतीय लसूण आकाराने लहान असतो. भारतातील हिमाचल प्रदेश आणि तमिळनाडू भागात चिनी वाणाचा उटी प्रजातीचा लसूण पिकवला जातो. जो हुबेहूब चिनी लसणासारखा दिसतो. चिनी लसणावर प्रक्रिया केल्यामुळे तो पूर्णतः पांढरा दिसतो.

१,२३५ गोण्या - गुरुवारची आवक

३५० रुपये प्रतिकिलो - चिनी लसणाचा घाऊक भाव

३०० रुपये प्रतिकिलो - देशी लसणाचा घाऊक भाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT