Agriculture Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : चिंचोलीचे शेतकरी सिंचनापासून वंचित

Agriculture News : उपवितरीका (कालवा) दुरुस्ती तसेच पाटसरीचे काम रखडल्याने चिंचोली येथील शेतकरी बेंबळा प्रकल्पाच्या पाण्यापासून वंचित आहेत.

Team Agrowon

Yavatmal News : उपवितरीका (कालवा) दुरुस्ती तसेच पाटसरीचे काम रखडल्याने चिंचोली येथील शेतकरी बेंबळा प्रकल्पाच्या पाण्यापासून वंचित आहेत. गेल्या १४ वर्षांपासून या संदर्भाने त्याकरिता पाठपुरावा केला जात आहे. हे काम तातडीने व्हावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

कळंब तालुक्‍यातील चिंचोली येथील आष्टा वितरिका व त्यावरील उपवितरिका (कालवा) क्रमांक चार व पाचची कायमस्वरूपी दुरुस्ती करण्यात यावी. चिंचोली येथील पाटसरी कायमस्वरुपी बांधून देण्यात यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

गेल्या १४ वर्षांपासून याकरिता शासनस्तरावर यासाठी पाठपुरावा सुरू आहे. संबंधित कार्यालयाचे उंबरठेही सातत्याने झिजविण्यात आले. परंतु त्यांच्या मागण्यांची दखल घेण्यात आली नाही.

परिणामी चिंचोली भागातील शेतकऱ्यांवर सिंचनापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. यामुळे झालेल्या नुकसानीची दखल घेत १४ वर्षांतील सिंचनामुळे वाढणारी उत्पादकता विचारात घेऊन भरपाई मिळावी, अशी मागणी देखील शेतकरीस्तरावर होत आहे.

चिंचोली शेत गट क्रमाक ९६ मधून गेलेल्या कालव्याचे क्षेत्र सर्वाधिक आहे. मात्र हेतुपुरस्सरपणे याबाबत कमी नोंद घेण्यात आली. त्यामुळे कालव्याची मोजणी परत करण्यात यावी, अशी देखील मागणी आहे. २०१५ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंग यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांची दखल घेत त्या सोडवणुकीचे आदेश दिले होते.

शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्‍न सोडवित त्यांना दिलासा देण्यात यावा, अशी मागणी गुरुदास बावणे, नरेश शिरस्कार, पांडुरंग हिवराळे, वसंत हिवराळे, गणेश हिवराळे, वासुदेव गोरे, नामदेव हिवराळे, प्रभा इंगोले, कल्पना इंगोले, गणेश आगलावे, प्रीतम कडू, मंगला कडू, नरेश कोकांडे, विक्रांत कडू, सुरेश चावके, मारोतराव चावके, धोंडेबा भोंग, कल्पना बावणे, सूरज बावणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT