Anganwadi Sevika Samp Agrowon
ॲग्रो विशेष

Anganwadi Sevika Strike : अंगणवाडी सेविका संपामुळे बालके आहारापासून वंचित

जिल्ह्यातील साडेनऊ हजार अंगणवाडी सेविका, मदतनीस या संपात सहभागी असल्याने, गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यातील लाखो बालके पोषण आहारापासून वंचित आहेत.

Team Agrowon

Nagar News : महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या वतीने अंगणवाडी सेविकांनी (Anganwadi Sevika)आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरात सोमवारपासून (ता. २०) बेमुदत संप सुरू आहे.

शुक्रवारी (ता.२४) संपाच्या पाचव्या दिवसांपर्यंत कोणताही तोडगा निघाला नाही. परिणामी, हा संप सुरूच आहे.

जिल्ह्यातील साडेनऊ हजार अंगणवाडी सेविका, मदतनीस या संपात सहभागी असल्याने, गेल्या पाच दिवसांपासून जिल्ह्यातील लाखो बालके पोषण आहारापासून वंचित आहेत.

वेतनश्रेणी लागू करणे किंवा मानधनात वाढ करणे, पेन्शन लागू करणे आदी प्रमुख मागण्यांसाठी २० फेब्रुवारीपासून महाराष्ट्रात अंगणवाडी कर्मचारी संघटनांच्या कृती समितीने अंगणवाडी सेविका-मदतनीस यांचा बेमुदत राज्यव्यापी संप पुकारला आहे.

तालुका, जिल्हा, तसेच राज्य पातळीवर अंगणवाडी सेविकांकडून दररोज निदर्शने, मोर्चे सुरू आहेत. परंतु अद्यापि शासनाने यावर तोडगा काढला नाही. यापूर्वी २०१४ मध्ये ४५ दिवस व २०१७ मध्ये ४० दिवस अंगणवाडी सेविकांचे आंदोलन सुरू होते.

त्यामुळे आता आणखी किती दिवस हे आंदोलन सुरू राहणार, याकडे लक्ष लागले आहे. नगर जिल्ह्यात एकूण ५ हजार ६३४ लहान-मोठ्या अंगणवाड्या आहेत.

यात ४ हजार ५९५ अंगणवाडी सेविका, ८१६ मिनी सेविका, तर ४ हजार १४२ मदतनीस असे एकूण साडेनऊ हजार कर्मचारी आहेत. हे सर्व जण बेमुदत संपात सहभागी असल्याने अंगणवाड्यांना सोमवारपासून कुलूप आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT