Crop Compensation Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : अतिवृष्टीच्या भरपाईला मुख्य सचिवांची मंजुरी

Heavy Rain Crop Loss : आयुक्तांनी तातडीने तो प्रस्ताव सरकाला सादर केल्यानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली.

Team Agrowon

Dharashiv News : जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई लवकरच मिळण्याची संकेत मिळत आहेत. विभागीय आयुक्तांनी भरपाईच्या निधी मागणीसाठी पाठवलेल्या प्रस्तावाला मुख्य सचिवांनी मंजुरी दिली असून विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे मंजूर भरपाईचे वाटप करण्याची परवानगी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे मागितली आहे.

ही परवानगी मिळताच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाईचे वाटप सुरू होणार, असल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्ह्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे केल्यानंतर एक लाख ८० हजार ७८६ शेतकऱ्यांचे एक लाख ६३ हजार ९७ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याची माहिती समोर आली.

या शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एनडीआरएफ) व राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या (एसडीआरएफ) निकषानुसार हेक्टरी १३ हजार आठशे रुपयांप्रमाणे भरपाईसाठी २२१ कोटी ८१ लाख तीस हजार ८० रुपये निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी चार ऑक्टोबरला विभागीय आयुक्तांकडे पाठवला होता.

आयुक्तांनी तातडीने तो प्रस्ताव सरकाला सादर केल्यानंतर विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. यामुळे या प्रस्तावाला मुख्य सचिवांनी मंजुरी दिली असून निवडणूक आयोगाकडून भरपाईचे वाटप करण्यासाठी परवानगी मागितली आहे.

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून लवकरच परवानगी मिळण्याची आशा प्रशासनाला आहे. दरम्यान ५७ पैकी ३६ मंडळात अतिवृष्टी झाली असून अतिवृष्टी न झालेल्या तालुक्यात पुरामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

या पिकांच्या पंचनामे करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने निवडणूक आयुक्तांकडे परवानगी मिळण्याबाबत प्रस्ताव पाठवला आहे. दरम्यान ऑक्टोबरमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईबाबत अजून काहीच हालचाल नसल्याचे चित्र आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT