Solar Pump Scheme  Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Solar Scheme : मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजनेचा राष्ट्रीय सन्मान

Solar Energy : महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी शनिवारी नवी दिल्ली येथे हे पुरस्कार स्वीकारले.

Team Agrowon

Nashik News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कृषिपंपांसाठी दिवसा वीजपुरवठा व्हावा म्हणून सुरू केलेल्या मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० या योजनेला ऊर्जा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी प्रतिष्ठेचा स्कॉच सुवर्ण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर महावितरणच्या सौर ग्रामयोजनेला स्कॉच रजत पुरस्कार मिळाला.

महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी शनिवारी नवी दिल्ली येथे हे पुरस्कार स्वीकारले. स्कॉच समूहातर्फे दर वर्षी सार्वजनिक क्षेत्रात उपयुक्त ठरलेल्या विविध योजनांसाठी पुरस्कार देण्यात येतात.

विविध तज्ज्ञांकडून अत्यंत काटेकोरपणे परीक्षण होऊन परीक्षकांच्या मतांच्या आधारे हे पुरस्कार दिले जातात. सार्वजनिक क्षेत्रातील योजनांसाठीचे हे पुरस्कार प्रतिष्ठेचे मानले जातात.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एप्रिल २०२३ मध्ये ही योजना सुरू झाल्यानंतर गतीने अंमलबजावणी सुरू आहे.

आतापर्यंत ४९ प्रकल्प पूर्ण झाले असून, त्यांची क्षमता २०३ मेगावॉट आहे. मार्च २०२६ पर्यंत ही योजना पूर्ण होईल व राज्यातील सर्व कृषिपंप सौरऊर्जेवर चालविण्याचे स्वप्न पूर्ण होईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, गवार भावात घसरण, पालक आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार तर डाळिंब दरात बदल

NCC Colonel Commandant Degree: कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना मानद ‘कर्नल कमांडंट’ पदवी

Analog Paneer Ban: राज्यात कृत्रिम (एनालॉग) पनीरवर वर्षभराची बंदी

Water Conservation: श्रमदानातून पाणीदार झाले ‘सालईबन’

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

SCROLL FOR NEXT