Ethanol production Agrowon
ॲग्रो विशेष

Ethanol Production : इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध हटविल्याच्या केंद्राच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

Sugar Industry : केंद्र सराकरने गेल्या वर्षी इथेनॉल निर्मितीवर निर्बंध घातले होते. मात्र, आता हे निर्बंध हटविण्यात आल्याने राज्यातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Team Agrowon

Pune News : केंद्र सरकारकडून इथेनॉल निर्मितीवर घातलेले निर्बंध हटविण्यात आले आहेत. केंद्राच्या या निर्णयाचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. केंद्र सराकरने गेल्या वर्षी इथेनॉल निर्मितीवर निर्बंध घातले होते. मात्र, आता हे निर्बंध हटविण्यात आल्याने राज्यातील साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

केंद्र सरकारने मागील वर्षी डिसेंबरमध्ये उसाचा रस, बी-हेवी मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली होती. इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध मागे घेवून साखर कारखान्यांना इथेनॉल निर्मितीसाठी परवानगी द्यावी, यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला होता.

साखर उद्योगाला दिलासा

दरम्यान, केंद्र सरकारने २०२४-२५ च्या गाळप हंगामासाठी इथेनॉल निर्मितीवर घातलेले निर्बंध हटविले आहेत. केंद्राच्या या निर्णयामुळे राज्यातील साखर कारखाने आणि डिस्टलरीजना मोठा दिलासा मिळाल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटले आहे.

केंद्र शासनाने आज घेतलेल्या निर्णयामुळे आता नव्या हंगामात राज्यातील साखर कारखान्यांना आणि डिस्टिलरीजना उसाचा रस, सिरप, बी हेवी मेालॅसिस पासून इथेनॉल निर्मिती करता येणार आहे.

केंद्र सरकाच्या इथेनॉल निर्मितीच्या निर्बंधांमुळे लाखो रुपये खर्च करून इथेनॉल प्रकल्प उभारलेल्या साखर कारखाने अडचणीत आले होते. मात्र, इथेनॉल निर्मितीवरील निर्बंध हटविल्यामुळे हे प्रकल्प पुन्हा एकदा कार्यान्वित होणार आहेत. यामुळे साखर उद्योगात समाधान व्यक्त केले जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार; कापूस आवक मंदावली, मटारच्या दरात नरमाई, बटाटा आवक चांगली तर ज्वारीचे दर टिकून

Ramling Sanctuary: रामलिंग अभयारण्यातील वाघाच्या वास्तव्याची वर्षपूर्ती

Urea Smuggling: युरिया तस्करीचा डाव उधळला

Wheat Sowing: जळगाव जिल्ह्यात गव्हाची ६५ हजार हेक्टरवर पेरणी

Maharashtra Winter: राज्यात थंडीची लाट; राज्यात पुन्हा थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT