Maharashtra Assembly Elections 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Election Results 2024 : मुख्यमंत्री शिंदे, फडणीस, अजित पवार, मुंडे आघाडीवर, भुजबळ, दिलीप वळीसे-पाटील पिछाडीवर

Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ चा निकाल अवघ्या काही तासांतच लागणार आहे. राज्यात आमचीच सत्ता येणार असे सत्ताधाऱ्यांसह विरोधक म्हणत आहेत. पण राज्यातील जनता कुणाच्या बाजूने कौल देणार? हे निकाल अवघ्या काही तासांत उघड होणार आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीचे कल हाती येत आहेत. पहिल्या कलांप्रमाणे मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आघाडी घेतली आहे. भुजबळ, दिलीप वळीसे-पाटील पिछाडीवर असून काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात देखील पिछाडीवर आहेत.

बारामतीत काका-पुतण्या

बारामतीत काका-पुतण्याच्या लढाईकडे अख्या राज्याचे लक्ष लागून राहीले असून पहिल्या फेरीत अजित पवारांना ९२९१ मते मिळाली आहेत. तर युगेंद्र पवारांना ५६६८ मतं मिळाली आहे.

परळी विधानसभा

बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले असून येथे धनंजय मुंडे यांना टपाली मतांमध्ये आघाडी मिळाली नव्हती. पण आता ईव्हीएम मतांमध्ये त्यांनी मोठी आघाडी घेतली आहे.

चंद्रकांत पाटील आघाडीवर

पुण्यातील कोथरूडमधून पोस्टल मतदानातून चंद्रकांत पाटील जवळपास ७००० पेक्षा अधिक मतांनी आघाडीवर आहेत. चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात उद्धव ठाकरे सेनेचे चंद्रकांत मोकाटे आणि मनसेचे किशोर शिंदे लढत आहेत.

गुलाबराव पाटील यांची आघाडी

जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबराव पाटील यांनी आघाडी घेतली असून त्यांनी राष्ट्रवादीचे गुलाबराव देवकर यांनी पिछाडीवर टाकले आहे.

भुजबळ मताधिक्य राखणार?

येवल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे छगन भुजबळ हे पिछाडीवर गेले होते. पण आता ते ८६ मतांची आघाडी घेतली आहे. त्यांच्यासमोर माणिकराव शिंदे यांचे आव्हान आहे. तर त्यांचे पुतणे समीर भुजबळ देखील नांदगावमधून पिछाडी असून शिंदे गटाचे सुहास कांदे ८२०० मतांनी आघाडीवर आहेत.

कागलमध्ये समरजित घाटगे आघाडीवर

कागलमध्ये पोस्टल मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे समरजित घाटगे आघाडीवर असून हसन मुश्रीफ पिछाडीवर आहेत.

दिलीप वळसे पाटील पिछाडीवर

आंबेगाव विधानसभेत ईव्हीएम मतमोजणीत आदिवासी भागातून दिलीप वळसे पाटील पिछाडीवर आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे देवदत्त निकम यांनी सुरुवातीच्या कलामध्ये आघाडी घेतली आहेत.

जयंत पाटील आघाडीवर

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जयंत पाटील १६ हजार ३१७ मतांनी आघाडीवर आहेत. येथे अजित पवार गटाचे निशिकांत भोसले-पाटील यांना १४ हजार १२० मते मिळाली आहेत. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई हे २ हजार ७२२ मतांनी आघाडीवर आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Post Monsoon Rain: मॉन्सूनोत्तर पाऊसही सरासरीपेक्षा अधिक

Maharashtra Rain Forecast: राज्यात पावसाला पोषक हवामान

Rain In October 2025 : देशात ऑक्टोबर महिन्यात सरासरीच्या ११५ टक्के पावसाचा अंदाज; राज्यावर पावसाचं सावट

Farmer Union Protest: ओला दुष्काळ, ५० हजार रुपये मदतीच्या मागणीसाठी शेतकरी-शेतमजूर संघटनांचे आयुक्तांना निवेदन

Paddy Harvesting : सिंधुदुर्गात पुन्हा जोरदार पाऊस; भातपीक कापणी रखडली

SCROLL FOR NEXT