Chia Seed  Agrowon
ॲग्रो विशेष

Chia Seed Rate : चिया सीडला प्रारंभी मिळाला २३ हजार रुपये दर

Chia Seed Farming : या वर्षी साडेतीन हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रांवर रब्बीत चियाची लागवड झाली असून या पिकाची खरेदी स्थानिक पातळीवर करण्याच्या उद्देशाने वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीने पुढाकार घेतला आहे.

 गोपाल हागे

Washim News : जिल्ह्यात मागील काही वर्षात चियासीड लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. या वर्षी साडेतीन हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रांवर रब्बीत चियाची लागवड झाली असून या पिकाची खरेदी स्थानिक पातळीवर करण्याच्या उद्देशाने वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीने पुढाकार घेतला आहे.

मंगळवारी (ता.११) चियासीड खरेदीच्या प्रारंभी उच्चांकी २३ हजार रुपयांचा दर देण्यात आला. बाजारात पहिल्या दिवशी २५ क्विंटलपर्यंत चियाची आवक झाली होती, अशी माहिती सभापती माधवराव काकडे यांनी दिली.

राज्यात वाशीम जिल्हा चियासीड लागवडीमध्ये अग्रेसर होत आहे. या हंगामात साडेतीन हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रांवर लागवड झाली आहे. आता चियासीड काढणीला सुरुवात झाली आहे. पुढील काही दिवस हा हंगाम चालणार आहे.

मागील दोन वर्षांत जिल्ह्यातील चियासीड शेतकरी कंपन्यांमार्फत खरेदी झाले होते. प्रामुख्याने रसायनमुक्त पद्धतीने पिकवलेला चिया खरेदीचा करारही झालेला आहे. यंदाही त्याच पद्धतीने खरेदी केली जात आहे. मात्र, उर्वरित शेतकऱ्यांचा चियासीड विकण्यासाठी सुविधा म्हणून बाजार समितीत व्यवहार सुरू करण्यात आले आहेत.

वाशीम बाजार समितीने पणन विभागाची परवानगी घेत चिया खरेदीला प्रारंभ केला. जिल्ह्यात चियाचे क्षेत्र वाढले आहे. त्यामुळे बाजारपेठेची गरज होती. याचा शेतकऱ्यांना निश्‍चितच फायदा होईल.
- राजूभाऊ चौधरी, संचालक, बाजार समिती वाशीम
चियासीडची खरेदी महाराष्ट्रात केली जात नव्हती. निमज (मध्य प्रदेश) येथेच बाजारपेठ आहे. हे पीक शेतकऱ्यांना रब्बीत चांगला पर्याय म्हणून जिल्ह्यातील शेतकरी स्वीकारत आहेत. शेतकऱ्यांची निकड पाहता आम्ही संचालक मंडळाने निर्णय घेत वाशीम बाजार समितीत खरेदी सुरू केली. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांचा वेळ, वाहतुकीचा खर्च वाचेल. शेतकऱ्यांना बाहेरराज्यात जाण्याची गरज भासणार नाही.
- माधवराव काकडे (गुरुजी), सभापती, वाशीम बाजार समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT