Chhatrapati Sugarcane Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Industry : ‘छत्रपती’ कारखान्याकडून ३ लाख ६४ हजार टन गाळप पूर्ण

Sugarcane Crushing : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने सन २०२४- २०२५ या गळीत हंगामामध्ये ३ लाख ६४ हजार टन ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण केला.

Team Agrowon

Pune News : भवानीनगर (ता. इंदापूर) येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याने सन २०२४- २०२५ या गळीत हंगामामध्ये ३ लाख ६४ हजार टन ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण केला.

श्री छत्रपती कारखान्याचा गळीत हंगामास २० नोव्हेंबर रोजी सुरुवात झाली आहे. गाळपाचा ५७ वा दिवस पूर्ण झाला आहे. कारखान्याने आतापर्यंत ३ लाख ६४ हजार ५५ टन उसाच्या गाळपाचा टप्पा पूर्ण केला आहे. तसेच गाळप झालेल्या उसाला सरासरी साखरेचा उतारा १०.३१ टक्के मिळाला असून, ३ लाख ६६ हजार २०० क्विंटल साखरेची निर्मिती झाली आहे.

सहवीज निर्मिती प्रकल्पातून १ कोटी ९० लाख ९७ हजार ९०० युनिट वीजनिर्मिती झाली आहे. कारखान्याने ६६ लाख ९५ हजार ९०० युनिटचा अंतर्गत वापर केला असून, १ कोटी २४ लाख विजेची निर्यात केली आहे.

तसेच १५ डिसेंबरपर्यंत गाळप झालेल्या सभासदांच्या खात्यावर २८०० रुपये प्रतिटनाप्रमाणे पहिला हप्ता जमा करण्यात आला आहे. तसेच, १६ डिसेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत गाळप झालेला उसाचा हप्ता २४ ते २७ जानेवारी रोजी जमा होणार आहे. १ जानेवारी ते १५ जानेवारीपर्यंत गाळप झालेल्या उसाचा हप्ता १० फेब्रुवारी रोजी जमा होणार आहे.

हंगामातील अंतिम साखर उतारा व साखरेचे दर विचारात घेऊन अंतिम ऊस दरही जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न राहणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे व उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT