Water Pollution Agrowon
ॲग्रो विशेष

Water Pollution : रसायनमिश्रित सांडपाणी थेट पावसाळी नाल्‍यात

Waste Water : खालापूर आणि पनवेल तालुक्याच्या वेशीवर पाताळगंगा औद्योगिक वसाहत असून ४० हून अधिक कारखाने सुरू आहेत.

Team Agrowon

Khalapur News : तालुक्यातील सर्वांत मोठी औद्योगिक वसाहत पाताळगंगा आहे; मात्र येथील कंपन्‍यांमधून रसायनयुक्‍त पाणी थेट नाल्‍यात सोडण्यात येत असल्‍याने पाताळगंगा नदीतील प्रदूषणात वाढ होण्याची भीती व्यक्‍त होत आहे.

खालापूर आणि पनवेल तालुक्याच्या वेशीवर पाताळगंगा औद्योगिक वसाहत असून ४० हून अधिक कारखाने सुरू आहेत. सावरोली-खारपाडा राज्यमार्गाच्या दुतर्फा सांडपाणी वाहून नेण्यासाठी काँक्रीटचे गटार बांधण्यात आले आहे; मात्र काही दिवसांपासून गटारातील सांडपाण्याचा रंग बदलला आहे.

रसायनमिश्रित पाणी सोडण्यात येत असल्‍याने तांबूस, लाल भडक रंगाचे पाणी सध्या वाहत आहे. त्‍यामुळे नदीपात्राला प्रदूषणाचा धोका निर्माण झाला आहे. जलचर तसेच अनेक गावांतील पेयजल योजनांवर परिणाम होण्याची शक्‍यता आहे. अनेकदा रात्रीच्या वेळी टँकरमधून रात्रीच्या वेळी रासायनिक सांडपाणी गटारात सोडले जाते.

शेतीवरही परिणाम

पाताळगंगा नदीतील पाण्याचा उपयोग अनेक शेतकरी सिंचनासाठी करतात. मात्र आता नदीपात्र दूषित झाल्‍याने भातशेतीबरोबरच भाजीपाला लागवडीवरही परिणाम झाला असून उत्‍पादन घटल्‍याचे शेतकऱ्यांचे म्‍हणणे आहे.

पाताळगंगा नदीवर अनेक पेयजल योजना आहेत. रासायनिक सांडपाणी सोडल्यामुळे नागरिकांचे आरोग्‍य धोक्‍यात येऊ शकते. याशिवाय पर्यावरण तसेच जलचरांनाही धोका उद्‌भवू शकतो. गळभोई, आदिवासी समाज अद्याप नदीत मासेमारी करून उपजीविका करतो. त्‍यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
- ॲड. विजय खारकर, मोहपाडा
गटारात सोडण्यात आलेल्या सांडपाण्याचे नमुने घेतले आहेत. याप्रकरणी चौकशी करून संबंधितांवर योग्य कारवाई करण्यात येणार आहे.
- उत्तम माने, अधिकारी, प्रदूषण नियामक महामंडळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन दरात चढ-उतार, गवार भावात घसरण, पालक आवकेत घट, वांगी दरात चढ-उतार तर डाळिंब दरात बदल

NCC Colonel Commandant Degree: कुलगुरू डॉ. शरद गडाख यांना मानद ‘कर्नल कमांडंट’ पदवी

Analog Paneer Ban: राज्यात कृत्रिम (एनालॉग) पनीरवर वर्षभराची बंदी

Water Conservation: श्रमदानातून पाणीदार झाले ‘सालईबन’

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

SCROLL FOR NEXT