Ajit Pawar Agrowon
ॲग्रो विशेष

Vegetable Cluster : जुन्नरला रसायनमुक्त भाजीपाला क्लस्टर उभारणार - अजित पवार

Ajit Pawar : शेतीसमृद्ध जुन्नर तालुक्यात रसायनमुक्त भाजीपाला उत्पादन आणि निर्यात क्लस्टर केंद्र सरकारच्या माध्यमातून उभारण्यात येईल,अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

Team Agrowon

Pune News : शेतीसमृद्ध जुन्नर तालुक्यात रसायनमुक्त भाजीपाला उत्पादन आणि निर्यात क्लस्टर केंद्र सरकारच्या माध्यमातून उभारण्यात येईल,अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी ओतूर (ता.जुन्नर) येथे बुधवारी (ता.८) रात्री आयोजित प्रचारसभेत श्री. पवार बोलत होते.

यावेळी पवार म्हणाले,‘‘ जुन्नर तालुका पर्यटन तालुका असून, त्याच्या विकासासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शिवनेरी किल्ल्याच्या संवर्धनासाठी १०० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. आणखी १०० कोटींचा निधी देणार आहे.

तर केंद्र सरकारकडून पर्यटन विकासासाठी निधी आणायचा आहे. तसेच जुन्नर तालुक्यात रसायनमुक्त भाजीपाला उत्पादन आणि निर्यात क्लस्टर केंद्र सरकारकडून आणायचे आहे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारांचा शिवाजीराव आढळराव पाटील खासदार दिल्लीत गेला पाहिजे.

काय आहे रसायनमुक्त भाजीपाला क्लस्टर

तळेगाव फ्लोरिकल्टचर पार्कच्या धर्तीवर जुन्नर तालुक्यात रसायनमुक्त भाजीपाला उत्पादन क्लस्टर उभारण्यात येणार आहे. हे क्लस्टर स्पेन आणि इस्राईल च्या कृषी तंत्रज्ञानावर आधारित असणार असून,यासाठी केंद्र सरकारचा विशेष निधीची गरज भासणार आहे.

रासायनिक खतांच्या बेसुमार वापरामुळे मानवी आरोग्यासह माती, पाणी आण पर्यावरणाचे देखील आरोग्य बिघडले आहे. यामुळे रासायनिक खतांच्या संतुलित वापरातून रसायनमुक्त भाजीपाल्याचे उत्पादन आणि निर्यातीतून तरूण शेतकरी उद्योजक घडवायचे आहे. अशी संकल्पना शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मांडली आहे.

कोल्हे यांच्यावर निशाणा

विद्यमान खासदार अमोल कोल्हे हे केवळ अभिनेते असून, त्यांनी मतदारसंघाच्या प्रश्‍नाकडे दुर्लक्ष्य केले. त्यांना उमेदवारी देणे ही माझी चूक झाली. ती चुक आता सुधारण्याची वेळ आली आहे. तर शिवसंस्कार सृष्टीच्या माध्यमातून वडजची जागा हडपण्याचा काहींचा डाव होता अशी टीका ही पवार यांनी कोल्हे यांचे नाव न घेता केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसीठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचा १,५०० रुपयांचा हप्ता आजपासून जमा होण्यास सुरुवात

Farmer Relief: अकोला जिल्ह्यात शेतकऱ्यांना वाढीव मदतीसाठी ५ कोटी मंजूर

Maize Crop Damage: बुलडाण्यात पावसाचा मका पिकाला तडाखा

Cotton Pink Bollworm: गुलाबी बोंड अळी व्यवस्थापनासाठी कीटक मिलन व्यत्यय तंत्रज्ञान फायद्याचे

Goat Farming : बंदिस्त शेळीपालनात खाद्य, आरोग्य व्यवस्थापनावर भर

SCROLL FOR NEXT