Onion Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Crop Damage : बदलत्या वातावरणाचा खटाव तालुक्यात कांदा रोपांना फटका

Climate Change Issue : सततच्या पावसाचा खटाव तालुक्यात कांदा रोपांना फटका बसला आहे. पाऊस पूर्ण थांबण्याची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत.

Team Agrowon

Satara News : सततच्या पावसाचा खटाव तालुक्यात कांदा रोपांना फटका बसला आहे. पाऊस पूर्ण थांबण्याची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत. या हंगामात पावसामुळे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना तीन ते चार वेळा कांदा बियाणे टाकून रोपे तयार करावे लागले आहेत. दरम्यान, सध्या बाजारात कांद्याचे भाव समाधानकारक असल्याने रब्बीच्या कांद्याला चांगले दर मिळतील,

या अपेक्षेने या हंगामातही रब्बी कांदा लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे. खटाव, खातगुण, भांडेवाडी, लोणी व भोसरे भागात कांदा लागवडीची लगबग सुरू झाली आहे. मात्र, लागवडीचा वेग वाढण्यासाठी पाऊस पूर्ण थांबण्याची प्रतीक्षा शेतकरी करीत आहेत.

रब्बी हंगामातील कांदा महत्त्वाचे पीक असल्याने दरवर्षी तालुका कांदा उत्पादनात अग्रेसर असतो. मागील वर्षी कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले; परंतु बाजारभावाअभावी शेतकऱ्यांनी कांदा वखारीत साठवून ठेवला. अनेक महिने बाजारभावाची प्रतीक्षा करताना कांदा खराब झाला.

मात्र, गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने व कांद्याला चांगला दर असल्याने शेतकरी कांदा लागवडीचे नियोजन करू लागला आहे. गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थिती असूनही शेतकऱ्यांनी खूप कष्टाने कांदा जगवला होता; पण दर मिळाला नाही. यंदा कांदा भावात वाढ झाली आहे; पण शेतकऱ्यांकडे कांदा उपलब्ध नाही, त्यामुळे केवळ व्यापाऱ्यांचीच चांदी असल्याची चर्चा शेतकरी वर्गात सुरू आहे.

अलीकडच्या काळात कांदा पिकाच्या उत्पादन खर्चातही मोठी वाढ झाली आहे. कांदा बियाणे एकरी तीन किलो लागते. या भागात नाशिक गरवा रोपांना चांगली मागणी आहे. यावर्षी कांदा लागवडीसाठी ट्रॅक्टर, मजुरी, खत, शेणखत, शेतबांधणी असा एकरी ८० हजार रुपये खर्च येत आहे.
धनाजी काटकर, प्रगतिशील शेतकरी, काटकरवाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार ; टोमॅटो दर टिकून, केळीला मागणी, आल्याला उठाव तर गवारची आवक टिकून

Sugarcane FRP Dues: थकीत 'एफआरपी'प्रश्नी ८१ साखर कारखान्यांना नोटिसा, सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची विधानपरिषदेत माहिती

Cotton Productivity Mission: कापूस उत्पादकता अभियान फसण्याचे संकेत

Rain Update In Maharashtra: कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील ६ जिल्ह्यांत जोरदार पावसाचा अंदाज 

Crop Insurance: पीकविमा योजनेत शेतकऱ्यांना वेळेत नुकसान भरपाई मिळेना; कृषिमंत्र्यांची कबुली

SCROLL FOR NEXT