Drip irrigation  Agrowon
ॲग्रो विशेष

Drip irrigation : तुषार संचधारक शेतकऱ्यांना तीन वर्षानंतर ठिबकचा लाभ ; केंद्राकडून अनुदान धोरणात बदल

Trickle Irrigation : तुषार सिंचनासाठी लाभ घेतलेल्या त्याच शेतकऱ्याला तीन वर्षानंतर ठिबकचा लाभ मिळणार आहे

Team Agrowon

Pune News : केंद्र शासनाने सूक्ष्म सिंचनाच्या अनुदान वाटप धोरणात मोठे महत्त्वाचे बदल केले आहेत. तुषार संचाचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्याला आता सात ऐवजी तीन वर्षांत पुन्हा सूक्ष्म सिंचनाचा लाभ देण्यास मान्यता मिळाली आहे. तसेच, अॅटोमेशनलादेखील अनुदानाच्या कक्षेत आणले गेले आहे.

केंद्राच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून पंतप्रधान सूक्ष्म सिंचनासाठी प्रति थेंब अधिक पीक या उपक्रमासाठी अनुदान मिळते. या योजनेतील किचकट बाबी हटवून काही बदल करण्याचा प्रस्ताव राज्याकडून केंद्राला पाठविला गेला होता. त्यानुसार केंद्राने २०२३ मधील नव्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल केले आहेत. सध्याच्या नियमानुसार सूक्ष्म संचासाठी सात वर्षांत पुन्हा अनुदान घेता येत नाही. आता हा कालावधी तीन वर्षांपर्यंत कमी करण्यात आला आहे.

एखाद्या शेतात तुषार संचासाठी अनुदान घेतलेल्या शेतकऱ्याला आता तीन वर्षानंतर ठिबक संच घेण्याकरिता अनुदान देता येणार आहे. परंतु, ठिबक अनुदानाची परिगणना करताना आधीच्या तुषार संचासाठी दिलेल्या अनुदानाची रक्कम ठिबकच्या अनुदानातून वजा करून उर्वरित रक्कम शेतकऱ्याला मिळणार आहे. या बदलामुळे शेतकऱ्याला एकाच क्षेत्रावर पीक पद्धतीत बदल करण्याची संधी मिळाली आहे. यामुळे ठिबकखालील क्षेत्रात वाढ होणार असून खते व पाण्याची बचत होण्यास मदत मिळेल, असे फलोत्पादन विभागाचे म्हणणे आहे.

फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते यांनी सांगितले की, सूक्ष्म सिंचन कार्यक्रम राबविण्यात राज्य आघाडीवर आहे. मात्र, या योजनेत बदल करण्यासाठी २०२२ मध्ये केंद्राला प्रस्ताव देण्यात आला होता. त्यातील बदल स्वीकारण्यात आले आहेत. ठिबक आधारित स्वयंचलित प्रणालीसाठी (अॅटोमेशन) आता प्रतिहेक्टरी ४० हजार रुपये अनुदान देण्यास केंद्राने मान्यता दिली आहे. यामुळे राज्यातील अॅटोमेशन आधारित उच्च तंत्रज्ञान कृषी व्यवस्थेला बळकटी मिळणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Success Story: क्षारपड जमिनीला दिली नवसंजीवनी

Gram Sadak Yojana: रस्त्यांसाठी ६४२९ कोटी मंजूर

Agriculture Technology: कृषी समस्या सोडवणुकीसाठी तंत्रज्ञान स्पर्धा महत्त्वाच्या...

Crop Insurance 2025 : यंदाच्या खरिपातही कमी भरपाई मिळणाची शक्यता जास्त

Stone Picker Machine: ट्रॅक्टरचलित दगड वेचणी यंत्र

SCROLL FOR NEXT