Team Agrowon
काजू, धान अशी पीकपद्धती असलेल्या कोकणात आता रेशीम शेती बहरणार आहे.
सध्या प्रायोगिक तत्त्वावर १६ शेतकऱ्यांनी पुढाकार घेत प्रत्येकी एक एकरावर तुतीची लागवड केली आहे.
रेशीम संचालनालयाने देखील रेशीमला प्रोत्साहन देण्याच्या प्रयत्नांतर्गत कोकणाकरिता स्वतंत्र रेशीम विभागाचा प्रस्ताव शासनाला पाठविला आहे.
पाऊस अधिक पडत असल्याने कोकण विभागात धान लागवड क्षेत्र सर्वाधिक आहे. त्याकरिता लहान-लहान आकाराच्या धान बांधी तयार केल्या जातात.
रेशीमसाठी राजापूर (रत्नागिरी), लांजा या दोन तालुक्यांतील १६ शेतकरी त्यासाठी पुढे आले आहेत.
रेशीम शेतीकरिता राज्याच्या इतर भागात ‘मनरेगा’तून अनुदान देण्याची तरतूद आहे. परंतु कोकण हा अपारंपरिक भाग असल्याने मनरेगा अनुदान योजनेची अंमलबजावणी येथे होत नव्हती.
शेतकऱ्यांचा उत्साह पाहता लांजा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुहास पंडित यांनी मनरेगा मूल्यांकनाकरिता मनुष्यबळ पुरविण्यासाठी अपेक्षीत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.
तूर्तास मनरेगाचा पर्याय उपलब्ध नसल्याने सिल्क समग्र- दोन नावांच्या योजनेत टाइप-१ प्रकारातील शेड उभारणीसाठी अनुदान देण्याचे प्रस्तावित आहे.