Chandwad APMC Agrowon
ॲग्रो विशेष

Chandwad APMC : चांदवड बाजार समिती सभापतींवर अविश्वास

APMC Market Politics : चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती विरुद्ध अविश्‍वास प्रस्ताव १३ विरुद्ध शुन्य मतांनी मंजूर करण्यात आला आहे.

Team Agrowon

Nashik News : चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती विरुद्ध अविश्‍वास प्रस्ताव १३ विरुद्ध शुन्य मतांनी मंजूर करण्यात आला आहे. बाजार समितीच्या इतिहासात पहिल्यांदाच सभापती विरुद्ध अविश्‍वास प्रस्ताव मंजूर झाला आहे.

सभापती संजय जाधव यांच्या विरोधात दाखल झालेल्या अविश्‍वास प्रस्तावावर निर्णयसाठी शुक्रवारी (ता. १६) चांदवड बाजार समितीच्या सदस्य मंडळाची प्रांताधिकारी कैलास कडलग यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी अकराला बैठक झाली. संचालक शिरीषकुमार कोतवाल, कारभारी आहेर, विक्रम मार्कंड, डॉ. सयाजीराव गायकवाड, रवींद्र पवार, पंढरीनाथ खताळ, सचिन अग्रवाल, गणेश निंबाळकर, डॉ. वैशाली जाधव, मीना शिरसाट, नितीन आहेर, डॉ. राजेंद्र दवंडे, योगेश ढोमसे हे १३ संचालक उपस्थित होते. संजय जाधव, डॉ. आत्माराम कुंभार्डे, सुकदेव जाधव, वाल्मीक वानखेडे तसेच वैद्यकीय कारणास्तव रजेवर असलेले सुशील पलोड हे चार संचालक अनुपस्थित होते.

अविश्‍वास प्रस्तावावर सर्व १३ संचालकांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे सभापती संजय जाधव यांच्या विरुद्धचा अविश्‍वास प्रस्ताव मंजूर करण्यात आला. दरम्यान, काल अविश्‍वास प्रस्तावावर चर्चा होण्याच्या एक दिवस अगोदर १५ मे रोजी सभापती संजय जाधव यांनी सभापतिपदाचा राजीनामा उपनिबंधक फय्याज मुलाणी यांच्याकडे सुपूर्द केला.

सभापतिपदाची धुरा हाती घेतल्यापासून आजपर्यंत बाजार समितीच्या सर्व घटकांना विश्वासात घेत कामे केली. परंतु सत्ताधारी पक्षाकडून योग्य ते सहकार्य लाभत नसल्याने बाजार समितीच्या अनेक निर्णयांना टाच लागत होती.

निवडणुकीपूर्वी सभापतिपदाचा राजीनामा बाजार समितीच्या दोन ज्येष्ठ संचालकांकडे सुपूर्द केला होता. परंतु कौटुंबिक कारणाने समक्ष उपस्थित राहून राजीनामा देणे शक्य झाले नाही, अशी प्रतिक्रिया जाधव यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Policy Implementation: पतपुरवठ्याचे उद्दिष्ट पूर्ण करा: जिल्हाधिकारी वर्षा मीना

Fruit Export Impact: निर्यातयोग्य फळ स्थानिक बाजारात आल्याने दरावर परिणाम

Women Agri Tools: महिलांसाठी कृषी अवजारे

Inspiration Story: कुबेराहून श्रीमंत असणारा गरीब

Ethanol Policy: इथेनॉलबाबत धोरणात्मक निर्णय आवश्यक

SCROLL FOR NEXT