Chandoli Sanctuary Affected agrowon
ॲग्रो विशेष

Chandoli Sanctuary Project : चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांचा आंदोलनाचा ३६ वा दिवस; प्रशासनाला जाग येणार कधी?

Chandoli Forest Department : वन खात्यानेच अतिक्रमण करत मणदूर या ठिकाणी आपली कार्यालये बांधली आहेत. ते पहिले अतिक्रमण त्यांनी काढावे व जागा मोकळी करावी.

sandeep Shirguppe

Chandoli Sanctuary People Protest : मागील ३६ दिवसांपासून चांदोली अभयारण्यातील प्रकल्पग्रस्तांचे बेमुदत आंदोलन सुरू आहे. याबाबत मंत्रालय पातळीवर बैठक होऊन निर्णय झालेला नाही. यासाठी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी भाग म्हणून सोमवारी (ता. १७) वन कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. अशी माहिती डॉ. भारत पाटणकर यांनी दिली.

यावेळी आंदोलनातील श्रमिक मुक्ती दलाच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली, यावेळी पाटणकर बोलत होते. "वन खाते आम्हाला कायदा सांगत आहे. मात्र वन खात्यानेच अतिक्रमण करत मणदूर या ठिकाणी आपली कार्यालये बांधली आहेत. ते पहिले अतिक्रमण त्यांनी काढावे व जागा मोकळी करावी". असा थेट सवाल पाटणकर यांनी केला.

"वन्यप्राणी बाहेर शेतीत येऊ नयेत म्हणून उपाययोजना करण्याचे निर्णय झाले होते. त्याची अंमलबजावणी आजअखेर सुरू झालेली नाही. शिवाय, अभयारण्यातून पुनर्वसित झालेल्या प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरू आहे. त्या बाबतीतसुध्दा मंत्रालयात बैठक होऊन निर्णय झाला नसल्याने यांचा संयुक्त मोर्चा सोमवारी वन कार्यालयावर मणदूर येथे निघणार आहे." अशी माहिती पाटणकर यांनी दिली.

या बैठकीस संतोष गोटल, मारुती पाटील, एम. डी. पाटील, पांडुरंग कोठारी, विनोद बडदे, सखाराम पाटील, शिवाजी पाटील, यशवंत पाटील, संदीप पाटील, राम माने, शंकर पाटील, उदय पाटील, निवृत्ती झाडे यांच्यासह प्रकल्पग्रस्त व वन्यप्राण्यांमुळे त्रास होणारे कार्यकर्ते उपस्थित होते.

आमदार विनय कोरे यांचे पत्र

भारत पाटणकर यांना आमदार विनय कोरे यांचे पत्र आले आहे. त्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून, मुख्यमंत्री यांनी गुरुवारी (ता. २०) किंवा शुक्रवारी (२१) बैठक घेण्याचे ठरविले आहे, असे पत्रात नमूद केले आहे. परंतु पाटणकर मोर्चावर ठाम असल्याचे सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

Turmeric Harvest Management: हळद काढणी पश्चात व्यवस्थापनावर मार्गदर्शन

Farmer Compensation Maharashtra : राज्यात २ लाख ४ हजार हेक्टर शेतीपिकांचं नुकसान; शेतकऱ्यांना लवकरात-लवकर मदत देणार, कृषिमंत्री भरणे यांची ग्वाही

Fertilizer Stock Approved: अकोला जिल्ह्यासाठी १.१४ लाख टन खत मंजूर

SCROLL FOR NEXT