Millet Rate agrowon
ॲग्रो विशेष

Millet Rate : यंदा बाजरीला दर मिळण्याची शक्यता, पावसाने उत्पादन घटले

Kharip Season : रब्बी हंगामात आणि आता खरिप हंगामामध्ये ज्वारी उत्पादन घटले आहे. यामुळे ज्वारीचे दर वाढण्याची शक्यता आहे.

sandeep Shirguppe

Maharashtra Millet Production : यंदा देशात अल निनोमुळे अत्यंत कमी पावसाची नोंद झाली आहे. कर्नाटक सरकारने १९५ तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर केले तर महाराष्ट्रात १८ जिल्ह्यांना मोठा धोका असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान याचा सर्वाधिक फटका खरिप पिकांना बसला आहे. यंदा खरिप पिकामध्ये कापूस आणि सोयाबीनला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. याचबरोबर ज्वारी पिकालाही मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

यंदा रब्बी हंगामात आणि आता खरिप हंगामामध्ये ज्वारी उत्पादन घटले आहे. यामुळे ज्वारीचे दर वाढण्याची शक्यता आहे. ज्वारीचा दर ५० पासून ८० रुपयांपर्यंत गेले आहेत. याचा ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळू शकतो. त्यात यंदाही पावसाचा लपंडाव सुरू असल्याने खरीप पिकांवर त्याचा मोठा परिणाम झाला असून, यावर्षी उत्पादन कमी होण्याची शक्यता अधिक आहे.

सध्या कोल्हापूर जिल्ह्यात गुजरात, कर्नाटकसह महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतून बाजरीची आवक होते. यातील सर्वाधिक आवक ही गुजरातमधून होते.

यंदा पाऊस कमी झाल्याने शिवारच फुलले नसल्याने सर्वच खरीप पिकांच्या उत्पादनात घट होणार आहे. ज्वारीचे उत्पादन कमी झाले तर दिवाळीनंतर ज्वारी, बाजरीसह शाळूच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

सध्या घाऊक बाजारात १ नंबर बाजरीला - ३ हजार २५०, मध्यम बाजरीला ३ हजार, वसंत ज्वारी ४ हजार ५०, महिंद्रा ज्वारी ४ हजार १००, बार्शी शाळू ८ हजार, मागच्या काही वर्षात बाजरीचा दर साधारणत २५ ते ३० रुपये होता. मात्र, सध्या एक नंबर बाजरी ३८ रुपये किलो असून, अजून हिवाळ्याची सुरुवात व्हायची आहे. हिवाळ्यात बाजरीची मागणी अधिक असते, त्यामुळे दरही वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT