Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीप; खरिपाच्या पेऱ्याला गती

Rain Update : सांगली जिल्ह्यात गेल्या सहा ते सात दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. गेल्या बारा दिवसांत १५८ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे.

Team Agrowon

Sangli News : सांगली जिल्ह्यात गेल्या सहा ते सात दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. गेल्या बारा दिवसांत १५८ मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. पावसाने उघडीप दिल्याने खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीला गती आली असून जूनच्या दुसऱ्या आठवड्यात २१ हजार ४४२ हेक्टरवर पेरा झाला असून भात, बाजरी पिकांचा पेरा सर्वाधिक झाला आहे.

जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र २ लाख ५५ हजार ९८४ हेक्टर इतके आहे. यंदा हवामान विभागाने १०६ टक्के पावसाची शक्यता वर्तवली आहे. जूनपासूनच यावर्षी पावसाला सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत जोरदार पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले. पाऊस पडल्याने खरीप हंगामातील पिकांच्या पेरणी, टोकणीचा प्रारंभ झाला.

परंतु सलग पाऊस पडल्याने शेतात पाणी साचले होते. यामुळे काही दिवस पेरणीला ब्रेक लागला होता. त्यामुळे शेतकरी वाफसा येण्याची प्रतीक्षा करू लागला. शिराळा तालुक्यात शेतकऱ्यांनी धूळ वाफेवरील भात पेरणी मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून प्रारंभ केला. शिराळा तालुक्यात धूळ वाफेवरील भाताची ५ हजार ३६१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. तर आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, कडेगाव या तालुक्यात अद्याप पेरणीला प्रारंभ झाला नसल्याचे कृषी विभागाच्या अहवालातून स्पष्ट होत आहे.

वाळवा, मिरज, जत, शिराळा या चार तालुक्यांत भात, बाजरी, सोयाबीन, उडीद, मूग, मका पिकांची पेरणी झाली आहे. गेल्या सहा ते सात दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ, कडेगाव या तालुक्यासह अन्य तालुक्यात खरीप पेरणीसाठी शेतकरी नियोजन करू लागला असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत २१ हजार ४४२ हेक्टर म्हणजे ८ टक्क्यांवर पेरा झाला आहे. या पावसामुळे आगाप पेरणी केलेल्या सोयाबीन, भात पीक वाढीला लागले आहे. शिराळा तालुक्यात २६.५७ टक्क्यांवर पेरणी झाली आहे. वाळवा तालुक्यात १५.२६ टक्के, जत तालुक्यात १५.१४ टक्के तर मिरज तालुक्यात ०.१७ आणि पलूसमध्ये ०.४१ टक्के पेरा झाला आहे.

तालुकानिहाय पेरणी क्षेत्र (क्षेत्र हेक्टरमध्ये)

मिरज ४२

जत ११८४०

वाळवा ३५२८

शिराळा ६००७

पलूस २५

एकूण २१४४२.९४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Harbhara Tur Kharedi: हरभरा-तूर खरेदीला मुदतवाढ; मेअखेरपर्यंत दिलासा

Jintur Water Shortage: जिंतूर तालुक्यातील ३ गावांना ५ टँकरद्वारे पाणीपुरवठा

Yeola Acid Attack Case: ‘पोलिस मित्र’च निघाला शेतकऱ्यावरील अ‍ॅसिड हल्ल्याचा सूत्रधार

Parbhani Crop Insurance: परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण विमा परतावा द्या: कृषिमंत्री भरणे

Sustainable Farming: शेतकऱ्यांनी शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करावा

SCROLL FOR NEXT