Chana Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Chana Sowing : हरभऱ्याची सुमारे दीड लाख हेक्टरवर पेरणी

Rabi Chana : खानदेशात हरभरा पिकाची विक्रमी पेरणी पूर्ण झाली आहे. सुमारे दीड लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात हरभरा पिकाची विक्रमी पेरणी पूर्ण झाली आहे. सुमारे दीड लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. यंदा हरभरा पिकाचे क्षेत्र स्थिर राहिले आहे. खानदेशात सुमारे साडेतीन लाख हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. रब्बी हंगामात हरभऱ्याची अधिकची पेरणी केली जाते. पण यंदा कमी पावसाने पेरणी कमी होईल, अशी स्थिती होती.

यंदा पेरणी घटली आहे, पण मोठी घट झालेली नाही. अनेकांनी हरभरा पेरणी करताना गहू, मका पिकाचे क्षेत्र कमी केले आहे. इतर पिकांना पाणी व खर्च अधिक लागतो. यामुळे कमी पाणी व कमी खर्चाचे पीक म्हणून हरभरा पेरणीकडे अनेकांचा कल होता. सुमारे १० हजार हेक्टरने पेरणी कमी दिसत आहे.

परंतु काही भागांत काबुली हरभरा पेरणी सुरू आहे. ही पेरणी आणखी पाच ते सहा हजार हेक्टरवर होईल, यामुळे क्षेत्र फारसे कमी राहणार नाही, अशी स्थिती आहे. सध्या क्षेत्र दीड लाख हेक्टरवर पोहोचले आहे.

जळगाव जिल्ह्यात काबुली हरभऱ्याची पेरणीदेखील स्थिर आहे. या पिकात अनेक शेतकरी प्रयोग करीत आहेत. चोपडा, यावल, रावेर भागांत रिकाम्या झालेल्या केळी बागांमध्ये काबुली हरभऱ्याची पेरणी अनेकांनी केली आहे.

तसेच काही शेतकऱ्यांनी कापूस पिकाखाली रिकाम्या झालेल्या क्षेत्रात काबुली हरभऱ्याची पेरणी केली आहे. काबुलीचे दर इतर हरभऱ्याच्या तुलनेत क्विंटलमागे तीन ते चार हजार रुपयांनी अधिक असतात. यामुळे शेतकऱ्यांनी काबुली पेरणीला प्राधान्य दिले आहे.

त्याला पाणी अधिक लागते. यामुळे ठिबकवरही त्याची पेरणी झाली आहे. कोरडवाहू हरभरा पीक काळ्या कसदार जमिनीत अधिक आहे. या क्षेत्रातील पिकही जोमात आहे. घाटे लगडत असून, त्यावर फवारणी घेतली जात आहे.

हरभऱ्यापाठोपाठ खानदेशात ज्वारीची पेरणी झाली आहे. ज्वारीची सुमारे ५० हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. तसेच मक्याची देखील ३० हजार हेक्टरवर पेरणी झाल्याचा अंदाज आहे. गव्हाची खानदेशात सुमारे ३२ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे.

हरभरा पेरणी स्थिती...

जळगाव जिल्ह्यात हरभऱ्याची एकूण एक लाख १८ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. धुळे व नंदुरबारात मिळून सुमारे ४५ हजार हेक्टरवर हरभरा पीक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT