Chana Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Chana Wilt Disease : मर रोगामुळे चार एकरातील हरभरा मोडला

Chana Crop Damage : हरभरा पिकावर मर रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने येथील शेतकरी अनुप देशमुख यांनी पिकामध्ये ट्रॅक्टर चालवला.

Team Agrowon

Akola News News : हरभरा पिकावर मर रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने येथील शेतकरी अनुप देशमुख यांनी पिकामध्ये ट्रॅक्टर चालवला.

अडगाव बुद्रुक परिसरातील विविध गावांमध्ये यंदा लागवड केलेले हरभऱ्याचे पीक सततच्या धुक्यामुळे अडचणीत सापडले आहे. पिकात मोठ्या प्रमाणात मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.

गेल्या आठवडयात मॉन्सूनोत्तर मुसळधार पाऊस झाला होता. यामुळेही नुकसान झाले. आता अनेक शेतांमध्ये हरभऱ्याच्या पिकात मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेतकरी यावर उपाययोजना करीत असताना कुठलाही फायदा होताना दिसत नाही.

धुक्यामुळे हरभरा पिकात मर रोग वाढत चालला. जागोजागी पीक वाळले. यामुळे उत्पादन खर्चही वसूल होणार नसल्याने येथील शेतकरी अनुप देशमुख यांनी पीक नांगरून टाकले.

लागवडीपूर्व मशागत, पेरणीसाठी आणलेले बियाणे, रासायनिक खते, मजुरी असा मोठा खर्च झालेला आहे. पुन्हा पीक मोडण्यासाठी खर्च करावा लागला. अशी अवस्था या भागात अनेक शेतकऱ्यांची झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: ‘त्या’ शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ; कृषिमंत्री भरणे यांची विधानसभेत माहिती

Monsoon Rain: पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांत पावसाचा जोर

Defective Groundnut Seeds: निकृष्ट भुईमूग बियाणे बदलून मिळणार; कृषिमंत्र्यांच्या निर्देशाने शेतकऱ्यांना दिलासा

Dimbhe Dam Reservoir: डिंभे धरणक्षेत्रात ६७ मिमी पाऊस; पूर्व भागातील शेतकरी अजूनही जोरदार सरींच्या प्रतीक्षेत

Monsoon Alert: मॉन्सूनच्या पावसाला दमदार सुरुवात

SCROLL FOR NEXT