Chana Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : धुक्यामुळे मोप मंडलातील हरभऱ्याचे पीक अडचणीत

Unseasonal Rain : गेल्या आठवड्यात मॉन्सूनोत्तर मुसळधार पाऊस झाला. यामध्ये नुकतेच पेरलेले हरभरा पीक तडाख्यात सापडले. अति पावसाने मर रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे.

Team Agrowon

Washim News : रिसोड तालुक्यातील मोप मंडलातील लोणी बुद्रुक परिसरातील विविध गावांमध्ये यंदाच्या हंगामात लागवड असलेले हरभऱ्याचे पीक सततच्या धुक्यामुळे अडचणीत सापडले आहे. पिकात मोठ्या प्रमाणात मर रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे.

गेल्या आठवड्यात मॉन्सूनोत्तर मुसळधार पाऊस झाला. यामध्ये नुकतेच पेरलेले हरभरा पीक तडाख्यात सापडले. अति पावसाने मर रोगाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आता पाऊस उघडला तरी दररोज मोठ्या प्रमाणात धुके पडते आहे.

कोवळ्या असलेल्या हरभरा, गहू पिकाला अत्यंत घातक ठरत आहे. यंदा पेरणी पूर्व मशागत, वखरणी,रोटावेटर, पेरणी, खत,बी- बियाणे आदीसाठी मोठा खर्च करावा लागला होता. पीकविमा काढण्यासाठी शासनाने जरी एक रुपयात व्यवस्था केली तरी प्रत्यक्षात पीकविम्याच्या जाचक अटींमुळे विमा मिळण्याची शक्यताही कमीच आहे.

धुक्यामुळे हरभरा पिकाला मर लागली आहे. जागोजागी उभी झाडे वाळली. उत्पादन खर्चही वसूल होणार की नाही, असा प्रश्‍न होत आहे.
प्रदीप बोडखे, शेतकरी, लोणी बुद्रुक, जि. वाशीम

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Fruit Drop: शुक्लकाष्ठ फळगळीचे!

Pimpalapur Farmer Death Assistance: पिंपळापूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची प्रशासनाकडून भेट; शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT