Amalner APMC Agrowon
ॲग्रो विशेष

Amalner APMC : अमळनेर बाजार समितीत सभापती ‘आघाडीचा की युतीचा’

APMC Update : विद्यमान सभापतींचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. नव्या सभापतींची निवड केली जाणार असून, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने आता सभापती महायुतीचा होईल की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Team Agrowon

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांत असलेल्या अमळनेर बाजार समितीत विद्यमान सभापतींचा एक वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. नव्या सभापतींची निवड केली जाणार असून, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने आता सभापती महायुतीचा होईल की काय, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

बाजार समितीच्या निवडणुकीच्या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडलेली नव्हती. दोन्ही काँग्रेसने ही निवडणूक लढवली. त्यात आघाडीला ११, तर भाजपला फक्त चार जागांवर विजय मिळाला होता. आघाडीचे नेतृत्व तत्कालीन आमदार तथा आताचे मंत्री अनिल पाटील व माजी आमदार साहेबराव पाटील यांनी केले होते. त्यात सभापतिपदी अशोक पाटील यांची एक वर्षासाठी निवड करण्यात आली होती.

परंतु सभापतिपदाचा एक वर्षांचा कार्यकाळ संपला आहे. यामुळे अन्य संचालकांनी सभापतिपदासाठी मोर्चेबांधणी, गाठीभेटी सुरू केल्या आहेत. परंतु आता राजकीय समीकरणे बदलली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असून, दोन गट तयार झाले आहेत. त्यात मंत्री पाटील हे अजित पवार गटात आहेत.

यामुळे ते काँग्रेसला सोबत घेऊन नव्या सभापतींची निवड करतात की भाजपसोबत जाऊन भाजपलाही संधी देतात, हा मुद्दा आहे. सध्या बाजार समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) सात, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चा एक, भाजपचे चार आणि काँग्रेसचे तीन संचालक आहेत. तसेच एक अपक्ष आणि दोन व्यापारी मतदार संघातून निवडून आलेले संचालक आहेत.

यामुळे नवे समीकरण तयार होईल व काँग्रेसला दूर ठेवून सभापती व उपसभापती निवडले जातील, अशीही चर्चा आहे. परंतु इच्छुकांनी बाजार समितीत राजकीय पक्ष नाही, सर्व पक्षीय राजकारण दूर आहे, असे सांगून अनेक जण सभापतिपदाची माळ आपल्या गळ्यात पडेल, असे सांगून कामाला लागले आहेत. परंतु अंतिम निर्णय मंत्री पाटील व साहेबराव पाटील हे घेतील, अशी माहिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Water Policy: महाराष्ट्राची जल-परंपरा आणि आधुनिक जलनीती

Pulse Beetle Identification,: कडधान्य साठवणुकीतील भुंगेऱ्याची ओळख

Organic Farming: सेंद्रिय शेती अन् पारंपरिक वाणांचा वारसा जपणाऱ्या ‘वैशालीताई’

Women Empowerment Story: महिला गटातून प्रक्रिया उद्योगाला चालना

Weekly Weather: तापमान वाढ, ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT