Maharashtra Drought  Agrowon
ॲग्रो विशेष

Drought Update : केंद्रीय पथकाने घेतला जालन्यातील दुष्काळाचा आढावा

Drought Crisis : केंद्रीय आंतर मंत्रालयीन समितीच्या पथकाने शुक्रवारी (ता. १४) जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत आढावा घेतला.

Team Agrowon

Jalna News : केंद्रीय आंतर मंत्रालयीन समितीच्या पथकाने शुक्रवारी (ता. १४) जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत आढावा घेतला.

यावेळी बैठकीस पथकाचे सदस्य केंद्रीय कापूस विकास अधिकारी डॉ. ए. एल. वाघमारे व मूल्यमापन व संनियंत्रण अधिकारी हरीश हुंबर्जे, अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके,

जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, उपविभागीय अधिकारी श्रीमंत हारकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, पशुसंवर्धन उपायुक्त श्री. कांबळे, आदीसह तहसीलदार, कृषी, सहकार, पाणीपुरवठा, जिल्हा अग्रणी बँक, वीज वितरण, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी सदस्यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची सविस्तर माहिती जाणून घेतली. जिल्ह्यात एकूण पडलेला पाऊस, खरिपाची पेरणी, पीकविमा, विविध प्रकल्पांतील पाणीसाठा,

टँकरद्वारे होणारा पाणीपुरवठा, जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता, पाणीपुरवठ्याच्या कार्यान्वित योजना, मनरेगाअंतर्गत रोजगाराची स्थिती, जलजीवन मिशन अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना यासह दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासनाने केलेल्या उपाययोजना याबाबत सदस्यांनी आढावा घेतला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: आंबा, काजू उत्पादकांचा मोर्चा मुंबईत रोखला, राजू शेट्टी, महादेव जानकरांची पोलिसांकडून धरपकड

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार; कापूस टिकून, मक्याचा भाव दबावातच, बाजरी आवकेचा दबाव, तूर स्थिरावली

Illegal Water Lifting: अवैध पाणी उपसा; तलावांवरील मोटारी हटविण्याचे आदेश

Lower Terna Project: निम्न तेरणा प्रकल्पाचा कारभार वाऱ्यावर

Land Acquisition: शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा निधी तातडीने द्या : मंत्री प्रकाश आबिटकर

SCROLL FOR NEXT